Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्पच्या डिनर सोहळ्यात गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा धक्कादायक 'मेनिफेस्टो' उघड; 'इराणी एजंट' विधानानं खळबळ; काय म्हणाला नेमकं?

Cole Allen Trump Shooting Manifesto: वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या 'व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनर'मधील गोळीबाराने संपूर्ण जग हादरले. या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोल ॲलन याला अटक करण्यात आली.

Manish Jadhav

Cole Allen Trump Shooting Manifesto: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्या उपस्थितीत शनिवारी (25 एप्रिल) रात्री वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या 'व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनर'मधील गोळीबाराने संपूर्ण जग हादरले. या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोल ॲलन याला अटक करण्यात आली असून त्याच्या 'मेनिफेस्टो'मधून अत्यंत धक्कादायक खुलासे झाले. हल्ल्याच्या अवघ्या 10 मिनिटांपूर्वी त्याने आपल्या कुटुंबाला हा मेनिफेस्टो पाठवला होता, ज्यामध्ये त्याने स्वतःला "फ्रेंडली फेडरल असैसिन" असे संबोधले होते.

सुरक्षा यंत्रणेची उडवली थट्टा

ॲलनने आपल्या'मेनिफेस्टो'मध्ये वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील (Hotel) सुरक्षा व्यवस्थेवर कडाडून टीका करत तिची थट्टा उडवली. त्याने लिहिले की, "मी अनेक शस्त्रे घेऊन हॉटेलमध्ये शिरलो, पण तिथे उपस्थित असलेल्या एकाही सुरक्षा रक्षकाला मी धोका वाटलो नाही. येथील सुरक्षा केवळ प्रदर्शनकर्त्यांवर लक्ष केंद्रित करते, पण जर कोणी एक दिवस आधीच हॉटेलमध्ये चेक-इन केले, तर काय होऊ शकते याचा विचार कोणीही केला नाही."

त्याने पुढे असेही म्हटले की, जर तो अमेरिकन नागरिक नसून 'इराणी एजंट' असता, तर त्याने तिथे एम2 ब्राउनिंग (M2 Browning) सारखे विनाशकारी शस्त्र सहज आणले असते आणि कोणाला पत्ताही लागला नसता. ही अक्षमता अत्यंत धक्कादायक असल्याचे त्याने नमूद केले.

"दुसरा गाल पुढे करणार नाही"

हल्ल्याच्या हेतूबद्दल बोलताना ॲलनने मेनिफेस्टोमध्ये लिहिले की, "दुसरा गाल पुढे तेव्हाच केला जातो जेव्हा तुम्ही स्वतः सतावले जात असता. मी तो व्यक्ती नाही ज्याचा छळ झाला आहे, पण जेव्हा इतर पीडित असतात तेव्हा गप्प बसणे हे ख्रिस्ती आचरण नाही; ती अन्यायातील भागीदारी आहे." त्याने ट्रम्प प्रशासनावर गंभीर आरोप करत अधिकाऱ्यांच्या हत्येचा इरादा स्पष्ट केला होता. एका नातेवाईकाने हा मेनिफेस्टो पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर हा सर्व कट समोर आला.

'नो किंग्स' आंदोलनाशी संबंध

तपासात असे समोर आले की, ॲलनने 'कॅप टॅक्टिकल फायरआर्म्स'मधून दोन हॅन्डगन आणि एक शॉटगन खरेदी केली होती. तो 'द वाइड अवेक्स' नावाच्या गटाशी संबंधित होता आणि त्याने कॅलिफोर्नियामध्ये 'नो किंग्स' नावाच्या निदर्शनांमध्येही सहभाग घेतला होता. तो व्यवसायाने शिक्षक असून शूटिंग रेंजमध्ये नियमित सराव करत असे. अमेरिकेचे ॲटर्नी जनरल टॉड ब्लॅंच यांच्या मते, ट्रम्प आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपवणे हाच त्याचा मुख्य उद्देश होता. एफबीआयने त्याच्या घराची झडती घेतली असून या मोठ्या सुरक्षा भंगाचा तपास आता आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

SCROLL FOR NEXT