Sameer Panditrao
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटून आले असताना अमेरिकेने ‘मिनिटमॅन-३’ या आंतरखंडीय अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
हे क्षेपणास्त्र ‘डुम्सडे मिसाइल’ म्हणून ओळखले जाते. कॅलिफोर्नियातील व्हँडेनबर्ग हवाई तळावरून त्याची चाचणी घेण्यात आली.
हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबाँबपेक्षाही वीस पटीने अधिक शक्तिशाली अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे.
प्रत्यक्ष युद्धाला तोड फुटल्यानंतर या क्षेपणास्त्राचा वापर झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होऊ शकते.
या क्षेपणास्त्रामध्ये घनरूप इंधनाचा वापर करण्यात येतो, त्यामुळे त्याला सतत अलर्ट मोडवर ठेवता येते.
या क्षेपणास्त्रामुळे ३० मिनिटांत जगाच्या कोपऱ्यात कोठेही मारा करणे शक्य आहे.
डुम्सडे मिसाइलचे एकूण वजन ३४ हजार किलो आहे.
या क्षेपणास्त्राची १३ हजार किलोमीटर मारक क्षमता आहे , १५ हजार मैल प्रतितास सदर क्षेपणास्त्राचा वेग आहे.