Donald Trump DainikGomantak
ग्लोबल

Iran Prison: 'इराणच्या तुरुंगात महिलांवर क्रूर अत्याचार...'!, ट्रम्पचा खळबळजनक दावा; द जेरुसलेम पोस्टचा रिपोर्ट केला शेअर

Trump Truth Social Jerusalem Post screenshot: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक विधान करत जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली.

Manish Jadhav

Trump Truth Social Jerusalem Post screenshot: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक विधान करत जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली. ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' अकाउंटवर 'द जेरुसलेम पोस्ट' या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर केला. या रिपोर्टमध्ये इराणच्या तुरुंगांमध्ये कैद्यांवर, विशेषतः महिला आणि अल्पवयीन मुलींवर मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचार होत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला.

चौकशीदरम्यान सुरक्षारक्षकांकडून महिलांना त्रास दिला जात असल्याचा आणि त्यांची छळवणूक केली जात असल्याचा उल्लेख यामध्ये आहे. मात्र, इराण (Iran) सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

त्याचबरोबर ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आता अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाल्याचा दावा केला. इराणला अमेरिकेसोबत करार करण्याची प्रचंड घाई आहे, मात्र अमेरिकेला इराणच्या अटी अजिबात मान्य नाहीत. इराण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून त्याच्याकडे आपल्या सैन्य आणि पोलीस दलाला देण्यासाठी पगारही उरलेला नाही. इराणची महागाई 350 टक्क्यांवर पोहोचली असून नौदल आणि हवाई दल पूर्णपणे कोलमडले आहे.

इराणच्या अणू कार्यक्रमावर बोलताना ट्रम्प यांनी कठोर भूमिका स्पष्ट केली. तेहरानला कधीही अण्वस्त्रे बनवण्याची किंवा ती बाळगण्याची परवानगी दिली जाणार नाही, कारण अण्वस्त्रे मिळताच इराण इस्रायल आणि इतर देशांवर हल्ला करु शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केला. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादून आर्थिक दबाव वाढवण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT