Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Regime Change in Iran Trump Statement: अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या ऐतिहासिक शस्त्रसंधीनंतर जागतिक राजकारणात आता मोठ्या घडामोडींना वेग आला.

Manish Jadhav

Regime Change in Iran Trump Statement: अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या ऐतिहासिक शस्त्रसंधीनंतर जागतिक राजकारणात आता मोठ्या घडामोडींना वेग आला. शुक्रवारी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या निर्णायक चर्चेपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत आपले धोरण अत्यंत आक्रमकपणे स्पष्ट केले. "इराणला आता यापुढे युरेनियम संवर्धन (Enrichment) करण्याची कोणतीही परवानगी दिली जाणार नाही," असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे शांतता प्रक्रियेत आता अण्वस्त्रांचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून ट्रम्प यांच्या विधानांनी तेहरानमध्ये खळबळ माजली.

ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्यंत वादग्रस्त आणि महत्त्वाकांक्षी दावा केला. ते म्हणाले की, "अमेरिका आता इराणसोबत मिळून काम करेल. एवढचं नाहीतर इराणमध्ये एक अत्यंत यशस्वी 'सत्तापालट' घडून येईल." या विधानाने राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधले. इतकेच नाही तर, इराणच्या भूगर्भात अतिशय खोलवर दडलेली अण्वस्त्रांची 'राख' (Nuclear Dust) शोधून काढून ती पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अमेरिका आपल्या 'बी-2 बॉम्बर्स'चा वापर करुन सर्व ताकद पणाला लावेल, असा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या जून महिन्यात इराणच्या अण्वस्त्र तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे सॅटेलाईट सातत्याने इराणच्या (Iran) युरेनियम साठ्यावर नजर ठेवून आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

एकीकडे इराणवर कडक अटी लादतानाच ट्रम्प यांनी काही सवलतींचे गाजरही दाखवले. जर इराणने अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या 15 मुद्द्यांपैकी महत्त्वाच्या अटी मान्य केल्या, तर त्यांना जागतिक निर्बंध आणि 'टॅरिफ'मधून मोठी सवलत दिली जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, यातील अनेक मुद्द्यांवर आधीच सहमती झाली आहे. मात्र, यासोबतच त्यांनी इराणच्या मित्रराष्ट्रांना उघड धमकी दिली. "जो कोणताही देश इराणला लष्करी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करेल, त्या देशाने अमेरिकेला विकलेल्या सर्व मालावर तात्काळ प्रभावाने 50 टक्के 'टॅरिफ' लावला जाईल," असा कडक इशारा त्यांनी दिला. यात कोणतीही सवलत किंवा दयामाया दाखवली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

ट्रम्प यांच्या या आक्रमक विधानांवर इराणने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, इस्लामाबादमधील बैठकीपूर्वी अमेरिकेने आपली बाजू वरचढ ठेवण्यासाठी ही रणनीती आखल्याचे दिसते. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अमेरिका आता कूटनीतिक दबाव आणि व्यापारी युद्धाचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. आता या इशाऱ्यांनंतर इस्लामाबादमधील शांतता चर्चा कोणत्या दिशेला वळते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT