Donald Trump has been Charged with Election Fraud. Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump यांचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगणार? निवडणूक गैरप्रकार अन् फसवणुकीचे आरोप निश्चित

Donald Trump: न्यूयॉर्क, दक्षिण फ्लोरिडा आणि वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांच्यावर आधीच खटले सुरू आहेत. जॉर्जियाचे हे प्रकरण आहे.

Ashutosh Masgaunde

Donald Trump has been Charged with Election Fraud:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणुकीत फसवणूक आणि गैरप्रकार केल्याचे आरोप मंगळवारी निश्चित करण्यात आले. यामुळे ट्रम्प यांच्या पुढील वर्षी होणारी निवडणूक लढवण्याचे स्वप भंगू शकते.

2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्यावर गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ट्रम्प यांच्यावरील आरोपांची दोन वर्षे चौकशी करण्यात आली आणि आता तपासानंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

सरकारी वकिलांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर १३ गुन्हे दाखल केले आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील हा चौथा आरोप आहे. पुढच्या वर्षी होणारी अध्यक्षीय निवडणूक लढवण्याच्या ट्रम्प यांच्या आशा यामुळे धुळीस मिळू शकतात. यामुळे मोठा धक्का बसू शकतो.

न्यूयॉर्क, दक्षिण फ्लोरिडा आणि वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांच्यावर आधीच खटले सुरू आहेत. हे प्रकरण जॉर्जियाचे (Georgia) आहे. या प्रकरणात, ट्रम्प यांच्यावर जॉर्जियाच्या रॅकेटियर इन्फ्लुएन्स्ड अँड करप्ट ऑर्गनायझेशन (RICO) कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

ट्रम्प यांच्यासोबत त्यांचे वकील रुडी जिउलियानी यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गुलियानी यांनी निवडणूक निकालांबाबत स्थानिक नेत्यांवर दबाव आणल्याचा आरोप आहे.

जॉर्जियामध्ये ट्रम्प आणि बिडेन यांच्यात चुरशीची लढत झाली होती, परंतु या प्रकरणामुळे ट्रम्प पुढील वर्षीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मागे पडू शकतात.

ट्रम्प यांच्यावील आरोप

जॉर्जियाचा RICO कायदा संघटित गुन्हेगारीला संपवण्यासाठी करण्यासाठी तयार करण्यात आला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत (US Presidential Election) पराभूत झाल्यानंतर राष्ट्रपती भवन सोडण्यापूर्वी अधिकाऱ्यांना फोन करून 11,780 मतांचा गैरप्रकार करण्यासाठी जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप आहे. या मतांच्या जोरावर जो बिडेन (Joe Biden) यांचा विजयाचा मार्ग खडतर झाला असता.

ट्रम्प यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गोपनीय कागदपत्रे ठेवल्याबद्दलही खटला सुरू आहे. रिपब्लिकन पक्ष ट्रम्प यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हणत आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT