Heaven Dainik Gomantak
ग्लोबल

स्वर्ग खरंच आहे! साक्षात मृत्यू अनुभवून जीवंत झालेल्या 5000 जणांवर केलेल्या संशोधनानंतर दावा

मृत्यूनंतर लोक एकतर स्वर्गात किंवा नरकात जातात हे अनेकदा तुम्ही ऐकले असेल. जरी सामान्यतः लोक स्वर्ग आणि नरकाचे अस्तित्व नाकारतात.

Manish Jadhav

मृत्यूनंतर लोक एकतर स्वर्गात किंवा नरकात जातात हे अनेकदा तुम्ही ऐकले असेल. जरी सामान्यतः लोक स्वर्ग आणि नरकाचे अस्तित्व नाकारतात. विशेषत: जे लोक विज्ञानावर विश्वास ठेवतात, ज्यात डॉक्टरांचाही समावेश आहे.

तसे, काही डॉक्टर असेही आहेत, ज्यांच्यासोबत कधी कधी अशा घटना घडतात की त्यांना चमत्कारांवर विश्वास ठेवायला भाग पाडले जाते.

आजकाल अशाच एका डॉक्टरची जगभरात चर्चा होत आहे, जो केवळ देवाच्या चमत्कारांवरच विश्वास ठेवत नाही तर तो स्वर्ग असल्याचा दावाही करतो.

दरम्यान, जेफ्री लाँग असे या डॉक्टरचे नाव आहे. ते रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहेत. केंटकी, यूएसए येथे कार्यरत आहेत.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, डॉ. जेफ्री म्हणतात की, त्यांचा असा विश्वास आहे की स्वर्ग आणि नरक यासारख्या गोष्टी अस्तित्वात आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, त्यांनी हजारो लोकांना मृत्यूनंतर परत येताना पाहिले आहे, म्हणजेच आत्मा लोकांचे शरीर सोडतो, परंतु तो पुन्हा शरीरात येतो. ते म्हणतात की, हे विज्ञानाच्या (Science) पलीकडे आहे.

5 हजार लोकांवर संशोधन करण्यात आले

डॉ.जेफ्री यांनी दावा केला आहे की, या जगाच्या पलीकडे एक स्वर्ग आहे, जिथे लोक मृत्यूनंतर जातात आणि कधी कधी लोक परत येतात. हा दावा करण्यापूर्वी त्यांनी मृत्यूचा अनुभव घेतलेल्या 5 हजार लोकांचे विश्लेषण केले.

ते म्हणाले की काही लोक वैद्यकीय कारणांनी मरतात, परंतु त्यांची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता निश्चितपणे अबाधित राहते.

एका महिलेच्या (Women) मृत्यूची कहाणी सांगताना ते म्हणाले की, तिला वाटले की तिचा आत्मा तिच्या शरीरातून निघून गेला आहे आणि तो घोड्यावरुन कुठेतरी जात आहे.

लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले

मृत्यूच्या जवळच्या आणखी काही कथांचे वर्णन करताना ते म्हणाले की, वैद्यकीयदृष्ट्या मृत्यू झालेल्या व्यक्तीने एक बोगदा पाहिला होता ज्यातून तेजस्वी प्रकाश येत होता. पुनरुत्थान झाल्यानंतर, त्याने सांगितले होते की त्याने आपल्या आत्म्याला शरीर सोडताना पाहिले होते, जो चमकत होता.

यासोबतच त्याने त्यांच्या अनेक मृत नातेवाईकांचीही भेट घेतली. काहींनी त्याचा आत्मा बागेत फिरताना पाहिला होता, तर काहींनी त्याला अंधाऱ्या जागी जाताना पाहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT