Divorce Case Dainik Gomantak
ग्लोबल

Divorce Case: घटस्फोटाचे अनोखे प्रकरण, नवऱ्याने बायकोला मागितली किडनी; वाचा नेमंक प्रकरण

Divorce Case: घटस्फोटाच्या अनेक केसेस तुम्ही पाहिल्या असतील, पण हे प्रकरण थोडे वेगळे आहे. सहसा पती किंवा पत्नी सेटलमेंट म्हणून पैसे मागतात.

Manish Jadhav

Divorce Case: घटस्फोटाच्या अनेक केसेस तुम्ही पाहिल्या असतील, पण हे प्रकरण थोडे वेगळे आहे. सहसा पती किंवा पत्नी सेटलमेंट म्हणून पैसे मागतात. मात्र या प्रकरणातील व्यक्तीने किडनी मागितली आहे. डॉ. रिचर्ड बतिस्ता यांनी त्यांच्या पत्नीला त्यांची किडनी परत करण्यास सांगितले, जी त्यांनी तिला दान केली होती. किडनी परत करता येत नसेल तर 12.2 मिलियन पौंड दे, अशी मागणी बतिस्ता यांनी आपल्या पत्नीकडे केली आहे. हे प्रकरण अमेरिकेतील आहे. 2009 मधील हे प्रकरण आहे. 1990 मध्ये बतिस्ता यांनी पत्नी डोनेलशी लग्न केले होते. दोघांना तीन मुले आहेत. मात्र पत्नीच्या सततच्या आजारपणामुळे या जोडप्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ लागल्या.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 2001 मध्ये बतिस्ता यांनी पत्नी डोनेलला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता. डोनेलच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. पत्नीचा जीव वाचवणे ही आपली पहिली प्राथमिकता असल्याचे बतिस्ता यांनी सांगितले होते. पण अवघ्या चार वर्षांनी त्यांची पत्नी डोनेलने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. यामुळे बतिस्ता खूप निराश झाले. त्यांनी पत्नी डोनेलवर प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. एकतर किडनी परत कर, नाहीतर पैसे दे, अशी मागणी बतिस्ता यांनी पत्नी डोनेलकडे केली. अशा स्थितीत किडनी परत करणे शक्य नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. तज्ज्ञांनी सांगितले की, डोनेलला बतिस्ता यांची किडनी परत करण्यासाठी दुसरे ऑपरेशन करावे लागेल. ज्यामुळे डोनेलच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. किडनी परत देणे शक्य नाही.

तथापि, डॉ. बतिस्ता यांची एकही मागणी पूर्ण झाली नाही. नासाऊ काउंटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. न्यायालयाने दहा पानी निकाल दिला. मॅट्रिमोनिअल रेफरी जेफ्री ग्रोब म्हणाले की, 'प्रतिवादीने नुकसानभरपाई आणि किडनीची मागणी करणे केवळ कायद्याच्या आवश्यकतेच्या विरोधात नाही, तर संभाव्यत: प्रतिवादीवर फौजदारी खटला चालवला जाऊ शकतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT