Daniel Ortega
Daniel Ortega Dainik Gomantak
ग्लोबल

निकाराग्वामध्ये हुकूमशाही अबाधित, चौथ्यांदा ओर्टेगा यांच्या हाती देशाची कमान !

दैनिक गोमन्तक

Nicaragua Elections News: मध्य अमेरिकन देश असलेल्या निकाराग्वामध्ये वादग्रस्त निवडणुकांनंतर निवडून आलेल्या संसद सदस्यांनी डॅनियल ओर्टेगा (Daniel Ortega) यांची राष्ट्रध्यक्ष म्हणून घोषणा केले आहे. त्यांनी शपथविधीच्या एक दिवस आधी पदभार स्वीकारला. शपथ घेतलेल्या 90 खासदारांपैकी 75 ऑर्टेगा (Daniel Ortega) यांच्या सॅन्डिनिस्टा पक्षाचे सदस्य आहेत. तर इतर15 पक्षांचे सदस्य आहेत. ज्यांना सरकारमधील सहयोगी मानले जात आहे. ज्येष्ठ सँडिनिस्टा नेते आणि खासदार गुस्तावो पोरोस (Gustavo Poros) यांची एकसदनी संसदेचा नेता म्हणून निवड केली आहे.

दरम्यान, 7 नोव्हेंबर रोजी संसद सदस्यांसाठी निवडणूक पार पडली, ज्यावर आंतरराष्ट्रीय निषेध नोंदविण्यात आला होता. निवडणुकीतून (Nicaragua election results) सलग चौथ्यांदा सत्ता गाजवण्यासाठी ओर्टेगा यांची निवड करण्यात आली. ऑर्टेगा यांना आव्हान देणाऱ्या सात संभाव्य उमेदवारांना मतदानाच्या काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आले. या निवडणुकीचे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. निकाराग्वा (Nicaragua) सरकारने नोव्हेंबरमध्ये घोषणा केली की, आम्ही ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स ( OAS) मधून माघार घेणार आहोत.

सरकारवर निवडणुकीदरम्यान दंगल घडल्याचा आरोप

ओएएस ही एक प्रादेशिक संस्था असून ज्याने ऑर्टेगाच्या सरकारवर दडपशाही आणि निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे. OAS जनरल असेंब्लीने निवडणुकीचा निषेध केला आहे. "ही मुक्त, निष्पक्ष किंवा पारदर्शक निवडणूक नव्हती आणि त्यात लोकशाही वैधतेचा अभाव होता." असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. OAS सदस्यांपैकी 25 सदस्य राष्ट्रांनी निंदा प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, तर मेक्सिकोसह सात देश अनुपस्थित होते. (Nicaragua Elections). केवळ निकाराग्वाने या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. दुसरीकडे, चीन, उत्तर कोरिया (North Korea), इराण (Iran), रशिया (Russia) आणि सीरियाचे प्रतिनिधी ओर्टेगा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. चीन आणि उत्तर कोरियामध्येही हुकूमशाही आहेत.

चीन आणि निकाराग्वा जवळ आले

चीन आणि निकाराग्वा अलीकडे एकमेकांच्या जवळ आले आहेत. 1990 नंतर पहिल्यांदाच चीनने निकाराग्वामध्ये आपला दूतावास उघडला आहे. कारण अध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांच्या सरकारने तैवानशी असलेल्या संबंधापासून फारकत घेतली आहे. (Nicaragua China Relations) त्यानंतर चीन-निकाराग्वा यांच्यात राजनैतीक संबंध प्रस्थापित झाले आहेत. वास्तविक चीन सातत्याने तैवानवर दावा करत आला आहे. तर तैवान (China Taiwan) स्वतःला स्वतंत्र देश असल्याचे मानतो. चीननेही निकाराग्वाला मोठ्याप्रमाणात कोरोना लसीचा पुरवठा केला आहे. ऑर्टेगाच्या सरकारने 1985 मध्ये चीनशी संबंध प्रस्थापित केले, परंतु 1990 च्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष विलेटा कामारो यांच्या सरकारने तैवानला मान्यता दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT