Pakistan Jaish-e-Mohammed commander killed by unknown gunmen Dainik Gomantak
ग्लोबल

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

Dhurandhar Style Killing In Pakistan: 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झकी-उर-रहमान लखवीचा जवळचा नातेवाईक हाफिज जुल्फिकार याची एका अज्ञात बंदूकधाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली.

Manish Jadhav

Dhurandhar Style Killing In Pakistan: पाकिस्तान आता दहशतवाद्यांचे सुरक्षित ठिकाण उरले नसल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चा मुख्य दहशतवादी आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झकी-उर-रहमान लखवीचा जवळचा नातेवाईक हाफिज जुल्फिकार याची एका अज्ञात बंदूकधाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या संदर्भातील एक सीसीटीव्ही फुटेज इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून, त्यात एका व्यक्तीवर अगदी जवळून डोक्यात गोळी झाडल्याचे स्पष्ट दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात हल्लाखोर पाठीमागून येतो आणि डोक्यात गोळी झाडतो. गोळी लागताच ती व्यक्ती जागीच कोसळते आणि हल्लाखोर तेथून पळ काढतो. हा मृत व्यक्ती दुसरा कोणी नसून हाफिज जुल्फिकारच असल्याचा दावा केला जात आहे. भारताचे माजी लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत "लपण्यासाठी कोणतीही जागा उरलेली नाही" अशी मार्मिक प्रतिक्रिया दिली. मात्र, या व्हायरल व्हिडिओची आणि हत्येच्या दाव्याची कोणतीही अधिकृत किंवा स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

झकी-उर-रहमान लखवी हा लष्कर-ए-तय्यबाचा लष्करी कमांडर असून 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे, ज्याला संयुक्त राष्ट्रानेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. 2008 मध्ये मुंबईत (Mumbai) झालेल्या या अमानुष दहशतवादी हल्ल्यात 166 निष्पाप लोकांचा जीव गेला होता. गेल्या काही काळापासून पाकिस्तानात भारतविरोधी कट रचणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अनेक कुख्यात दहशतवाद्यांची एकापाठोपाठ एक अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या केली जात आहे.

हाफिज जुल्फिकारची ही हत्या सुद्धा त्याच मालिकेचा भाग असल्याचे बोलले जात असून पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. जैश-ए-मोहम्मदसाठी तरुणांना भडकावून दहशतवादाच्या मार्गावर आणण्याचे काम जुल्फिकार करत होता. या घटनेमुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा 'अज्ञात बंदूकधाऱ्याची' दहशत पसरली असून, भारताच्या शत्रूंचा खात्मा पाकिस्तानातच होत असल्याचे पाहून सोशल मीडियावर भारतीयांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT