No Bank Robberies Dainik Gomantak
ग्लोबल

No Bank Robberies: असा देश ज्याचा तुम्हालाही वाटेल अभिमान, ज्याच्या नावे आहे अनोखा विक्रम

अलिकडच्या वर्षांत डेन्मार्कमध्ये हार्ड कॅशचा वापर कमी झाल्यामुळे एक विशेष कामगिरी नोंदली गेली आहे.

दैनिक गोमन्तक

दिवसेंदिवस बँक लुटण्याच्या घटना आपण पाहत असतो. काही दरोडे मोठे असतात आणि काही लहान असतात. सर्व तत्परतेनंतरही अशी प्रकरणे समोर येतात, पण तुम्हाला माहित आहे का की जगात असा एक देश आहे जिथे गेल्या 1 वर्षात बँक लुटण्याची किंवा लुटमारीची एकही घटना समोर आलेली नाही. तो देशही हा विशेष सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव डेन्मार्क आहे. अलिकडच्या वर्षांत हार्ड कॅशचा वापर कमी झाल्यामुळे हे घडले आहे. देशाच्या आर्थिक कामगार संघटनेच्या मते, डेन्मार्कने पहिले वर्ष बँक लुटल्याशिवाय पूर्ण केले आहे.

  • 2017 पासून आतापर्यंत १० पेक्षा कमी लुटमार

संस्थेने सोमवारी एका निवेदनात दावा केला की समाज आता रोख व्यवहारावर कमी अवलंबून असल्याने संस्थांनी त्यांच्या रोख सेवा कमी केल्या आहेत. त्यामुळे दरोडे पडण्याची शक्यता कमी झाली आहे. "हे खूपच आश्चर्यकारक आहे कारण जेव्हा रोख रकमेचा विचार केला जातो तेव्हा बँक कर्मचारी खूप दबावाखाली असतात," फायनानफोरबंडट युनियनचे उपाध्यक्ष स्टीन लुंड ओल्सेन यांनी एएफपीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. युनियनने 2000 मध्ये 221 बँक दरोडे नोंदवले, जे 2017 पासून हळूहळू 10 पेक्षा कमी झाले आहेत.

  • बॅंक कर्मचाऱ्यांची चिंता कमी झाली

डेन्मार्कच्या मध्यवर्ती बँकेच्या अभ्यासानुसार रोख व्यवहार 2017 मधील पेमेंटच्या 23 टक्क्यांवरून 2021 मध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये 12 टक्क्यांवर घसरला आहे. तर लुटमारीच्या घटनांमध्येही घट झाली आहे. गेल्या 1 वर्षात येथील बँक लुटमारीची एकही घटना घडलेली नाही. फायनान्स कर्मचारी संघटनेने असे निरीक्षण नोंदवले आहे की, पूर्वी ज्या बॅंकामध्ये लुटमार झाली आहे ते कर्मचारी चिंतेत असायचे. आता अशी प्रकरणे जवळजवळ संपली आहेत यामुळे बँक कर्मचार्‍यांची चिंता कमी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT