King Charles III & PM Modi: ब्रिटनचे राजे चार्ल्स III यांच्याशी PM मोदींनी साधला संवाद, अनेक मुद्यांवर झाली चर्चा

King Charles III of Britain & PM Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्यात मंगळवारी दूरध्वनीवरुन बातचित झाली.
King Charles III of Britain & PM Modi
King Charles III of Britain & PM ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

King Charles III of Britain & PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्यात मंगळवारी दूरध्वनीवरुन बातचित झाली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. यावेळी दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी आणि राजे चार्ल्स यांनी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. यावेळी, दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी भारतीय समुदायाच्या भूमिकेचेही कौतुक करण्यात आले.

राजे झाल्यानंतरचा पहिला संवाद

चार्ल्स तिसरे ब्रिटनचे राजे झाल्यानंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच बातचित झाली. याबद्दल पंतप्रधान मोदींनी (PM Modi) किंग चार्ल्स यांचे अभिनंदन केले. यावेळी पर्यावरण सुधारणा, जैवविविधता संवर्धन यासह अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली.

King Charles III of Britain & PM Modi
King Charles III: ब्रिटनचा राजा डोक्याला रूमाल बांधून पोहचला गुरुद्वारामध्ये, पुढे काय झाले पाहा

पीएमओकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी किंग चार्ल्स यांना जी-20 अध्यक्षपदाच्या प्राधान्यांबद्दल सांगितले. यासोबतच पर्यावरणासाठी (Environment) राबवण्यात येणाऱ्या मिशन एलआईएफई बद्दलही माहिती देण्यात आली.

King Charles III of Britain & PM Modi
World War III चा धोका लक्षात घेता पुतीन यांचा मेगा प्लॅन, अणुबॉम्बही...

पीएमओच्या म्हणण्यानुसार, दोन्ही नेत्यांनी कॉमनवेल्थ ऑफ नेशन्सवर विचारांची देवाणघेवाण केली. त्याचबरोबर त्याच्या मजबूत करण्याच्या मार्गांवरही चर्चा केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध समृद्ध करण्यात यूकेमधील भारतीय समुदायाच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Pakistan player refuses to meet King Charles
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com