Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

...अखेर 'इंफ्रास्ट्रक्चर बिल' मंजूर, बायडन यांचा ऐतिहासिक विजय

अशा प्रकारे, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन (Republican) यांनी मिळून या विधेयकाला मंजूरी दिली. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रकमेचे हे विधेयक सिनेटने मंजूर केले होते.

दैनिक गोमन्तक

यूएस काँग्रेसने (US Congress) $1.2 ट्रिलियनचे द्विपक्षीय इंफ्रास्ट्रक्चर बिल (Bipartisan infrastructure bill) मंजूर केले आहे. हे विधेयक पारित झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचा मोठा विजय मानला जात आहे. राष्ट्राध्यक्ष बायडन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्याचा मार्ग शोधत होते. अधिकहून रिपब्लिकन (Republican) खासदारांनी $1.2 ट्रिलियन वाहतूक आणि ब्रॉडबँड इंटरनेट अपग्रेड बिलाचे समर्थन केले. अशा प्रकारे, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन यांनी मिळून या विधेयकाला मंजूरी दिली. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रकमेचे हे विधेयक सिनेटने मंजूर केले होते.

दरम्यान, इंफ्रास्ट्रक्चर बिलाच्या माध्यमातून मोठे पॅकेज मंजूर करण्यात येणार आहे. या पॅकेजच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना आरोग्य सेवा, मुलांचे संगोपन आणि घरी वृद्धांची काळजी घेण्यास मदत होणार आहे. काँग्रेसमध्ये या विधेयकाच्या समर्थनार्थ 228 तर विरोधात 206 मते पडली. तर दुसरीकडे डेमोक्रॅट्ससह 13 रिपब्लिकन खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. तर सहा डेमोक्रॅट्सनी या बिलाच्या विरोधात मतदान केले. हे विधेयक आता राष्ट्रपतींकडे जाऊन त्यावर स्वाक्षरी करुन कायदा बनणार आहे. हे विधेयक ऑगस्टमध्येच सिनेटमध्ये मंजूर झाले होते. परंतु सभागृहात यावर मंजूरी देण्याचे थांबविण्यात आले होते. कारण डेमोक्रॅट स्वतंत्रपणे आणखी $ 1.9 ट्रिलियन आर्थिक पॅकेजची मागणी करत होते.

पायाभूत सुविधा विधेयकाद्वारे काय केले जाणार?

या विधेयकाद्वारे, येत्या पाच वर्षांत अमेरिकन पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी $550 अब्ज डॉलरची संघीय गुंतवणूक केली जाईल. याद्वारे रस्ते, पूल, प्रमुख सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, विमानतळ, बंदरे आणि जलमार्ग बांधणे आणि दुरुस्तीचे कामे करण्यात येणार आहे. देशातील ब्रॉडबँड पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी या पॅकेजमध्ये $65 अब्जची गुंतवणूक केली जाईल. याव्यतिरिक्त, इलेक्ट्रिक ग्रीड आणि पाणी प्रणाली सुधारण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल. बिलाच्या मजकुरानुसार, प्लग-इन इलेक्ट्रिक वाहन चार्जर्सचे देशव्यापी नेटवर्क तयार करण्यासाठी 7.5 अब्ज गुंतवणूक केली जाईल.

ऑगस्टमध्ये हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर करण्यात आले

ऑगस्टच्या सुरुवातीला, यूएस संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या यूएस सिनेटने $1,000 अब्ज डॉलरच्या पायाभूत सुविधा योजनेला मंजुरी दिली. हे पॅकेज राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्राधान्यक्रमाच्या शीर्षस्थानी होते. या प्रकरणात, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी एकजूट दाखवत योजनेला मंजुरी दिली. योजनेच्या बाजूने 69 तर विरोधात 30 मते पडली. मोठ्या संख्येने खासदारांनी मतभेद विसरून योजनेच्या बाजूने मतदान केले. सार्वजनिक कामांशी संबंधित कामांना गती देण्यासाठी खासदार पैसे पाठवण्याच्या तयारीत होते. सिनेटचे बहुसंख्य नेते चक शूमर म्हणाले की, अनेक मुद्दे आहेत पण ते अमेरिकेसाठी खूप चांगले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''गोवा में 15 साल भाजप आ नहीं सकती''; दिगंबर कामतांचा Video Viral, मुख्यमंत्र्यांनी वाजवल्या टाळ्या; नेटकरी थक्क!

Kolkata Crime: कोलकाता पुन्हा हादरलं! बर्थ डे पार्टीतच 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; मित्रच ठरले कर्दनकाळ

Bomb Blast In Pakistan: पाकिस्तानमध्ये LIVE क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी Watch Video

Affordable 350CC Bikes: स्पोर्टी लूक, दमदार परफॉर्मन्स...! 'या' धमाकेदार बाइक्समध्ये मिळतंय सर्व काही, किंमत फक्त...

Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

SCROLL FOR NEXT