अमेरिका (America) आणि चीन (China) यांच्याच सुरु असलेले व्यापारी युध्द सगळ्या जगाला चिरपरिचित आहे. यातच आता या दोन देशातील सुरु असलेले शीतयुध्द एवढ्या टोकाला येऊन पोहोचले आहे की, व्यापारी लढाईबरोबर आता सायबर लढाईदेखील सुरु झाली आहे. याच पाश्वभूमीवर अमेरिकन एव्हिएशन आणि एरोस्पेस कंपन्यांची ट्रेड सीक्रेट चोरण्याचा कट रचल्याबद्दल एका चिनी गुप्तहेरला (Chinese Spy) दोषी ठरवण्यात आले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने ही माहिती दिली आहे. हा गुप्तचर चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयासाठी काम करतो. चाचणीसाठी अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आलेला पहिला चिनी गुप्तहेर यांजुन जू (Yanjun Xu) याला कट रचल्याबद्दल आणि आर्थिक हेरगिरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. याशिवाय, जू ट्रेड सीक्रेट चोरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी आढळले आहे.
दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकानुसार, यंजुनला ट्रेड सीक्रेट चोरल्याच्या उल्लंघनांसाठी 60 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय त्याला पाच लाख डॉलर्सचा दंडही भरावा लागू शकतो. त्याला फेडरल जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश शिक्षा सुनावतील. "पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना द्वारे आयोजित केलेल्या हेरगिरी कारवायांचा सामना करण्यासाठी माहिती आणि संसाधने सामायिक करण्यासाठी ब्यूरो यूएस एजन्सींसोबत काम करत आहे," FBI सहाय्यक संचालक अॅलन कोहेलर जूनियर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
चीनला फायदा व्हावा यासाठी अमेरिकेचे तंत्रज्ञान चोरले गेले
कोहलर म्हणाले, ज्यांना चीनच्या वास्तविक उद्दिष्टांबद्दल शंका आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय एक वेक अप कॉल आहे. चीन आपली अर्थव्यवस्था आणि लष्कराचा फायदा घेण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञान चोरत आहे. 2013 मध्ये, यंजुनवर चीनच्या वतीने आर्थिक हेरगिरी केल्याचा आणि ट्रेड सीक्रेट चोरण्यासाठी अनेक उपनावांचा आधार घेतला असल्याचा आरोप होता. अनेक अमेरिकन एव्हिएशन आणि एरोस्पेस कंपन्या चिनी गुप्तहेरांच्या निशाण्यावर असल्याचे या रिलीझमध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे एक युनिट जीई एव्हिएशनचाही (General Electric Co) समावेश होता.
या निर्णयावर चीनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही
2018 मध्ये बेल्जियममध्ये चिनी गुप्तहेर यांजुन झूला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. चीनकडून शुक्रवारी दिलेल्या निर्णयावर अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. यापूर्वीदेखील बीजिंगने असे आरोप फेटाळून लावले असून अशा आरोपांना कोणताही आधार नसल्याचे म्हटले आहे. यूएस न्याय विभागाच्या निवेदनानुसार, झू हे चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाच्या जिआंगसू शाखेचे वरिष्ठ सदस्य आहेत. ही एक एजन्सी असून काउंटर इंटेलिजन्स, परदेशी गुप्तचर आणि अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, सीआयएने चीनला अमेरिकेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.