Deltacron dainik gomantak
ग्लोबल

Omicron नंतर आला Deltacron या देशात आढळली संसर्गाची पहिली केस

साइप्रस देशात आढळला डेल्टाक्रॉन चा नवीन रूग्ण

दैनिक गोमन्तक

दुसर्‍या लाटेत भारत आणि जगाला वाईटरित्या प्रभावित करणार्‍या डेल्टा प्रकारातून सावरल्यानंतर, ओमिक्रॉन प्रकार सध्या धोक्यात आहे, परंतु आता या दरम्यान आणखी एक प्रकार समोर आला आहे, ज्याला डेल्टाक्रॉन म्हणून ओळखले.

आधीच कोरोना ने थैमान घातले आहे. एकामागून एक कोरोना (corona) विषाणूचे नवीन प्रकार समोर येत आहे. दुस-या लाटेत वाईटरित्या प्रभावित करणाऱ्या डेल्टा प्रकारातून भारत आणि जग सावरल्यानंतर, ओमिक्रॉन या प्रकाराने जनजीवन सध्या धोक्यात आहे, परंतु आता या दरम्यान आणखी एक प्रकार समोर आला आहे, ज्याचे नाव आहे 'डेल्टाक्रॉन'.

एका प्रसिध्द झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, साइप्रसमध्ये डेल्टाक्रोन नावाचा नवीन कोरोना प्रकार समोर आला आहे. जेरुसलेम पोस्टने साइप्रस हवाला देत अहवाल दिला आहे की, डेल्टाक्रॉनची अनुवांशिक पार्श्वभूमी डेल्टा प्रकारासारखीच आहे, तसेच यात काही ओमिक्रॉन सारखे म्यूटेशन आहेत म्हणूनच त्याला डेल्टाक्रोन (delta) म्हटले गेले आहे. परंतू तज्ञांचे म्हणणे आहे की, याची काळजी करण्यासारखे फार काही नाही. साइप्रसमधून घेतलेल्या 25 नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचे एकूण 10 म्यूटेशन आढळले. यात 11 हे नमुने व्हायरसमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे होते. तर 14 सामान्य लोकांचे होते. तसेच साइप्रस विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान (Biotechnology) आणि आण्विक विषाणूशास्त्र प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. लिओनडिओस कोस्ट्रिकिस म्हणाले की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये म्यूटेशनची तीव्रता जास्त आहे.

डेल्टा आणि ओमिक्रॉन पासून बनला ' डेल्टाक्रॉन'

डॉ. लिओनडिओस कोस्ट्रिकिस म्हणाले की, या डेल्टाक्रॉन ला डेल्टा प्रकाराप्रमाणेच अनुवांशिक पार्श्वभूमी आहे. ओमिक्रॉनचे चे काही म्यूटेशन (mutation) देखील आहेत. साइप्रसचे आरोग्य मंत्री मिखलिस हाडजीपांडेलस म्हणाले की, हा नवीन वेरीयंट सध्या चिंतेचे कारण नाही. मंत्री महोदयांनी डेल्टाक्रॉन हा नवीन प्रकार शोधल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.

या संदर्भात मंत्री हाजीपांडेलस म्हणाले की, डॉ. कोस्ट्रिकिस यांच्या टीमने अभूतपूर्व संशोधन आणि निष्कर्ष काढल्याबद्दल आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. पुढे असेही म्हणाले की, या संशोधनामुळे आमचा साइप्रस देश आरोग्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. मात्र, या नवीन प्रकाराच्या वैज्ञानिकाचे नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM सावंतांच्या हस्ते Ironman 70.3 चा शुभारंभ! तेजस्वी सूर्या, अन्नामलाई, सैयामी खेर यांच्यासह 31 देशांतील 1300 ॲथलीट्सची उपस्थिती

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची 6 भाकितं ठरली खरी, भविष्यातील धोक्यांकडे जगाचे वेधले लक्ष; 2026 वर्षाबाबत सतावू लागली चिंता

Amanda Wellington: "मला भारताकडून क्रिकेट खेळायचंय..." दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेती ऑस्ट्रेलियन खेळाडूचं विधान चर्चेत VIDEO

Women Heart Attack: थकवा, श्वास घेण्यास त्रास? सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे हृदयविकाराची पूर्वसूचना, वेळीच उपचार घ्या

Writing History: माती, दगड आणि हाडे अशा वस्तूंवर चिन्हे कोरून, खुणांद्वारे विकसीत झालेली 'लेखनकला'

SCROLL FOR NEXT