Rwanda Genocide Dainik Gomantak
ग्लोबल

Rwanda Genocide: थरकाप उडवणारा रवांडाचा 'नरसंहार'; हुतू आणि तुत्सी यांच्यातील संघर्षात 8 लाख लोकांचा गेला होता जीव

Rwanda Genocide: रवांडा नरसंहाराच्या वर्धापनदिनानिमित्त कुतुबमिनार येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Manish Jadhav

Rwanda Genocide: रवांडा नरसंहाराच्या वर्धापनदिनानिमित्त कुतुबमिनार येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कुतुबमिनारवर रवांडाच्या ध्वजाच्या रंगाचे दिवे लावून या हत्याकांडाबाबत शोक व्यक्त करण्यात आला. रवांडामधील तुत्सी समुदायाविरुद्ध 1994 मध्ये झालेल्या नरसंहारावर संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय चिंतन दिवस (UN International Day of Reflection) साजरा करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवर पोस्ट करुन माहिती दिली की, आर्थिक संबंधांचे सचिव दम्मू रवि यांनी आज किगाली (रवांडाची राजधानी) येथील नरसंहाराच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त भारताचे प्रतिनिधित्व केले.

दरम्यान, एप्रिल 1994 हे आफ्रिकन देश रवांडासाठी भयंकर वर्ष ठरले. यावर्षी देशात थरकाप उडवणारे हत्याकांड घडले, ज्यामध्ये 100 दिवसांत 8 लाख लोकांचा मृत्यू झाला. या वर्षी रवांडाच्या नरसंहाराला तीन दशके झाली आहेत. हुतू आणि तुत्सी या दोन समुदयातील तणावातून हे हत्याकांड घडले होते.

दोन समुदयात तणाव

एप्रिल 1994 पूर्वीही हुतू आणि तुत्सी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. 1991 च्या जनगणनेनुसार 8.4 टक्के लोकसंख्या असलेले तुत्सी हे गोऱ्या युरोपियन लोकांच्या जवळचे मानले जात होते. हुतू एकूण लोकसंख्येच्या 85 टक्के होते, परंतु लोकसंख्या जास्त असूनही, त्यांना शिक्षण आणि आर्थिक संधी उपलब्ध नव्हत्या. तुत्सींनी दीर्घकाळ देशावर वर्चस्व गाजवले होते.

हुतू सत्तेवर आले

मात्र 1959 मध्ये, संपूर्ण आफ्रिकेत स्वातंत्र्य चळवळी सुरु झाल्यामुळे हुतूंनी तुत्सींविरूद्ध हिंसक बंड केले. तुत्सी समुदयाच्या जवळपास 100,000 लोकांनी हत्या आणि हल्ल्यांनंतर त्यांचे जीव वाचवण्यासाठी युगांडासह शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला. यानंतर तुत्सी समुदयाने रवांडा पॅट्रियट फ्रंट (RPF) ही बंडखोर संघटना स्थापन केली. ही संघटना 1990 च्या दशकात रवांडामध्ये आली आणि संघर्ष सुरु झाला.

हत्याकांडाच्या सुरुवातीचे कारण

दरम्यान, हे युद्ध 1993 मध्ये शांतता कराराने संपले. पण 6 एप्रिल 1994 च्या रात्री किगाली (रवांडाची राजधानी) रवांडा येथे तत्कालीन राष्ट्रपती जुवेनल हब्यारीमाना आणि बुरुंडीचे अध्यक्ष कप्रिएल न्तार्यामीरा यांना घेऊन जाणारे विमान पाडण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे सर्व लोक ठार झाले. जिथून या भयंकर हत्याकांडाची सुरुवात झाली होती.

लाखो मरण पावले

दरम्यान, हे विमान पाडण्याचा निर्णय कोणाचा होता हे अद्याप समजलेले नाही. काही लोक यासाठी हुतूला दोष देतात तर काही रवांडा पॅट्रिक फ्रंट (RPF) ला दोष देतात. हे दोन्ही नेते हुतू समुदयाचे असल्याने हुतूने त्यांच्या हत्येसाठी आरपीएफला जबाबदार धरले. त्यानंतर लगेचच हत्याकांड सुरु झाले. आरपीएफने हुतूवर आरोप केला की, त्यांना हत्याकांडाचे निमित्त मिळावे म्हणून हुतूने विमान पाडले होते.

महिलांविरुद्ध गुन्हा

या हत्याकांडाच्या आधी हुतूने अतिशय सावधरित्या तुत्सी लोकांची लिस्ट दिली होती, ज्यांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व लोकांना त्यांच्या कुटुंबासह मारण्यास सुरुवात केली. हुतू समुदयातील लोकांनी तुत्सी समुदयातील शेजाऱ्यांना मारले. सैनिकांनी रस्ते रोखून तुत्सींची धारदार शस्त्रांनी हत्या केली. एवढेच नाही तर हजारो तुत्सी महिलांचे अपहरण करण्यात आले. त्यांनी महिलांवर बलात्कार करुन घरे लुटली. त्याचबरोबर पीडितांना स्टेडियम किंवा शाळांसारख्या मोठ्या मोकळ्या जागेत नेण्यात आले जिथे त्यांची हत्या करण्यात आली. 100 दिवसांनंतर, 4 जुलै रोजी, जेव्हा RPF ने किगाली ताब्यात घेतले तेव्हा हत्या थांबल्या होत्या. मात्र, या हत्याकांडात किती लोक मरण पावले हे कदाचित कधीच कळणार नाही कारण तिथे अजूनही कबरी सापडतात. मात्र, तीन महिन्यांच्या या हत्याकांडात 8 लाख लोक मारले गेल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT