dead body of the criminal was found missing from the grave after two years in Brazil Dainik Gomantak
ग्लोबल

Brazil: अट्टल गुन्हेगार पोलिस चकमकीत ठार, दोन वर्षांनी कबरीतून अचानक गायब झाला मृतदेह

लाझारो बार्बोसा हा शहरातील वाँटेड गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, बलात्कार, प्राणघातक हल्ला, अपहरण असे डझनभर गुन्हे दाखल होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पोलीस चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराची कबर दोन वर्षांनंतर सापडली. मात्र, कबरीतून त्याचा मृतदेह गायब होता. याबाबत चौकशी केली असता एक धक्कादायक सत्य समोर आले आहे.

गुन्हेगाराची कबर खोदण्याचे काम 15 वर्षीय मुलीने केल्याचे निष्पन्न झाले असून, तिला कबरीत व्यक्ती (गुन्हेगार) जिवंत असून मदतीसाठी विचारत आहे. असे स्वप्न तिला पडल्याचे मुलीने सांगितले. ब्राझीलमधील गोयास राज्यातील ही घटना आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, 27 वर्षीय लाझारो बार्बोसा डी सौसा हा शहरातील वाँटेड गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, बलात्कार, प्राणघातक हल्ला, अपहरण असे डझनभर गुन्हे दाखल आहेत. 9 जून 2021 रोजी सीलँडिया येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करून तो फरार झाला होता. या घटनेच्या एका महिन्यानंतर पोलिसांच्या चकमकीत तो ठार झाला.

पण त्याच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी त्याची कबर खुली झाल्याने बार्बोसाचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. एका 15 वर्षांच्या मुलीने कबर खोदून तिचा मृतदेह बाहेर काढल्याचे सांगण्यात आले. कबरीतून मृतदेह गायब झाल्याची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एका 15 वर्षांच्या मुलीने तिच्या मैत्रिणीसोबत ही कबर खुली केली. बार्बोसा तिच्या स्वप्नात आला आणि मदतीची याचना केली. तो जिवंत असून त्याला बाहेर काढावे, असे सांगितले. यानंतर त्याने आपल्या 21 वर्षीय मित्रासोबत कबर खणून बार्बोसाचा मृतदेह बाहेर काढला. असे मुलीने चौकशीदरम्यान सांगितले.

मुलगी अल्पवयीन असल्याने तिचे नाव जाहीर केले जात नाही. मुलीला तिच्या 21 वर्षीय मित्राने स्मशानभूमीत नेले. दोघांच्या कपड्यांवर स्मशानभूमीची माती होती. सध्या तपास करून मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी स्थानिक वृत्त संस्थांना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT