12-Foot Crocodile Zimbabwe Hotel Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: हॉटेलच्या किचनमध्ये 'पाहुणी' आली! 12 फुटी महाकाय मगर थेट ओट्यावर स्वार, कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ; अंगावर काटा आणणारा थरार व्हायरल

12-Foot Crocodile Zimbabwe Hotel: झिम्बाब्वेतील व्हिक्टोरिया फॉल्सजवळील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडला. शुक्रवारी (24 एप्रिल) सकाळी एका महाकाय नाईल मगरीने 'ए'झाम्बेझी रिव्हर लॉज'मध्ये थेट प्रवेश केला.

Manish Jadhav

12-Foot Crocodile Zimbabwe Hotel: हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी कर्मचारी सज्ज असतात, पण जर पाहुणा म्हणून साक्षात 12 फुटी महाकाय मगर दारात उभी राहिली तर? असाच काहीसा अंगावर काटा आणणारा प्रकार झिम्बाब्वेतील व्हिक्टोरिया फॉल्सजवळील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडला. शुक्रवारी (24 एप्रिल) सकाळी एका महाकाय नाईल मगरीने 'ए'झाम्बेझी रिव्हर लॉज'मध्ये थेट प्रवेश केला, ज्यामुळे कर्मचारी आणि पर्यटकांची मोठी धांदल उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मगर जवळच वाहणाऱ्या झांबेझी नदीतून वाट चुकून हॉटेलमध्ये शिरली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावर हॉटेलने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ही शिकार शोधणारी मगर चक्क हॉटेलच्या किचन काउंटरवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या घटनेनंतर हॉटेल (Hotel) प्रशासनाने फेसबुकवर मिश्किल टिप्पणी करत लिहिले की, "आमच्या अमुलोंगा रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी सकाळी एक अनपेक्षित पाहुणा आला होता. 'रुम सर्व्हिसला उशीर का होतोय?' हे कदाचित तो तपासायला आला असावा. कोणतीही परवानगी नाही, आमंत्रण नाही की रिझर्व्हेशन नाही. हे झांबेझी आहे, जिथे 'वाईल्ड' म्हणजे खरोखरच 'वाईल्ड' असते!"

हॉटेलमध्ये मुक्कासाला असलेल्या जॉन रिचर्ड्स या ब्रिटिश पर्यटकाने या घटनेचा डोळ्याने पाहिलेला थरार सांगितला. "ती मगर अगदी एखादा पैसे देऊन राहणाऱ्या पाहुण्यासारखी वावरत होती," असे रिचर्ड्स यांनी गंमतीने म्हटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मगरीने आधी रिसेप्शन डेस्कवर चढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तिथल्या एका आरामखुर्चीवर निवांतपणे विश्रांती घेतली आणि शेवटी बाहेर असलेल्या वॉटर फीचरजवळ जाऊन बसली. वेटर्सनी पर्यटकांना सांगितले की, "जेव्हा मगरीला रेस्टॉरंटमध्ये टेबल मिळाले नाही, तेव्हा तिने रिसेप्शनवर चौकशी केली. तिथे कोणीही नसल्याने तिने किचनमध्ये शिरण्यासाठी काउंटरवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी मेनूमध्ये आपल्या आवडीचे काहीही नसल्याचे पाहून ती बाहेरच्या पाण्यात जाऊन स्थिरावली."

या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी हॉटेलच्या आवारात मगरीचा असा मोकळा वावर पाहून पर्यटकांमध्ये भीतीसोबतच आश्चर्याचे वातावरण होते. झिम्बाब्वेतील (Zimbabwe) हे हॉटेल नैसर्गिक अधिवासाजवळ असल्याने वन्यजीवांचे दर्शन होणे नवे नाही, मात्र 12 फुटी मगर थेट रिसेप्शन आणि सोफ्यापर्यंत पोहोचल्याची ही पहिलीच वेळ असावी. सध्या या 'साहेबी' थाटात वावरणाऱ्या मगरीचा व्हिडिओ जगभरात चर्चेचा विषय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Heatwave: उकाड्याने नागरिक हैराण; जलस्रोतांवर वाढली वर्दळ, 'धोंड तळी' बनली आकर्षणाचे केंद्र

Goa Politics: मुरगावात भाजपचे शिलेदार भक्‍कम स्‍थितीत, काँग्रेस पक्षासह विरोधक थंडच; माविन गुदिन्‍होंचे स्‍थान मजबूत

राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका

"ग्रहांच्या राजाची मेहरबानी!" 'या' राशींसाठी सूर्यदेव रिअल हिरो; कष्टाला मिळणार भाग्याची जोड अन् बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

ग्रामीण मुलांचा डंका- संपादकीय

SCROLL FOR NEXT