Covid 19 Vaccine Developer Scientist Dainik Gomantak
ग्लोबल

Coronavirus Vaccine बनवणाऱ्या शास्त्रज्ञाची बेल्टने गळा दाबून हत्या

Russia: 'स्पुतनिक व्ही' बनवण्यामध्ये सक्रीय असणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक आंद्रे बोटीकोव्ह यांची त्यांच्याच राहत्या घरी बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली.

Manish Jadhav

Coronavirus Vaccine: जगभरात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला असतानाच रशियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियाच्या अँटी-कोविड-19 लस 'स्पुतनिक व्ही' बनवण्यामध्ये सक्रीय असणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक आंद्रे बोटीकोव्ह यांची त्यांच्याच राहत्या घरी बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. रशियन मीडियाने दिलेल्या बातमीत ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, रशियन वृत्तसंस्था टासने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की, गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करणारे 47 वर्षीय बोटीकोव्ह गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते.

दुसरीकडे, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 2021 मध्ये कोरोना लसीबद्दल बोटीकोव्ह यांना 'ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड' पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अहवालानुसार, 2020 मध्ये 'स्पुतनिक V' लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी बोटीकोव्ह एक होते. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या समितीने टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हत्येचा गुन्हा म्हणून तपास केला जाईल.

अहवालात पुढे म्हटले आहे की, तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, 29 वर्षीय तरुणाने एका भांडणाच्या वेळी बोटीकोव्ह यांचा बेल्टने गळा दाबला आणि पळून गेला. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनुसार, त्या संशयिताला अटक (Arrested) करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT