जगात कोरोनाचा धोका (Coronavirus) अद्यापही कमी झालेला नसताना दुसरीकडे कोरोनाचे नव- नवे व्हेरिएंट नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर घालू लागले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील देश लसीकरणाच्या मोहीमा राबवत आहेत. मात्र तरीसुध्दा कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळून येत असल्याने तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) आता आणखी एका नवीन कोविड व्हेरिएंट निदर्शनास आला आहे. कोलंबियामध्ये (Columbia) म्यू व्हेरिएंटचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. B.1.621 हे या नव्या व्हेरिएंटचे शास्त्रीय नाव आहे. या वर्षी जानेवारीत पहिल्यांदा या व्हेरिएंटचे रुग्ण सापडले होते. या व्हेरिएंट संबंधित चार हजार रुग्ण जगातील 40 हून अधिक देशांमध्ये आढळून आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, म्यू व्हेरिएंटबद्दल चिंतेची बाब म्हणजे, या व्हेरिएंटवर कोरोना लस कमी गुणकारी ठरु शकते, असं डब्ल्यूएचओकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. WHO ने या व्हेरिएंटला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून संबोधले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, 'म्यू व्हेरिएंट कोलंबियामध्ये जानेवारी 2021 मध्ये आढळून आला होता. दरम्यान, म्यू व्हेरिंएंटचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
म्यू प्रकार किती धोकादायक आहे?
डेल्टा व्हेरिएंटसह, म्यू व्हेरिएंटच्या उपस्थितीवरही नजर ठेवण्यात येत असल्याचे कोलंबियाच्या आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. डब्ल्यूएचओ सध्या डेल्टा व्हेरिएंटव्यतरिक्त अल्फा, बीटा आणि गामाला 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हणून सूचीबद्ध केले आहे. म्यू व्यतिरिक्त, आयोटा, कप्पा आणि लॅम्बडा 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून दर्जा दिला आहे.
व्हेरिएंट म्हणजे काय?
कोणत्याही विषाणूला अनुवांशिक कोड असतो. हे एक प्रकारचे मॅन्युअल आहे, जे व्हायरस कधी, काय आणि कसे करावे हे सांगते. व्हायरसच्या अनुवांशिक कोडमध्ये वारंवार लहान लहान बदल होत असतात. बहुतेक बदल कमी प्रभावी असतात, परंतु काही बदलांमुळे व्हायरस वेगाने पसरु शकतो. या बदललेल्या विषाणूला एक नवा व्हेरिएंट म्हणून संबोधले जाते. यूके आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाची नव नवे व्हेरिएंट संसर्गजन्य आणि प्राणघातक असल्याचे मानले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.