Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan In Islamabad High Court: इम्रान खान यांना कोर्टाने दिला मोठा झटका, 8 दिवसांची सुनावली कोठडी

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या हत्येची भीती व्यक्त केली आहे.

Manish Jadhav

Imran Khan In Islamabad High Court: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या हत्येची भीती व्यक्त केली आहे. मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आल्यानंतर इम्रान खान यांना आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

येथे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने इम्रान खान यांची 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने इम्रान खान यांना 8 दिवसांसाठी NAB कोठडीत पाठवले आहे.

दरम्यान, इम्रान खान यांनी न्यायालयात खळबळजनक दावा केला. माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याचे त्यांनी सांगितले. इम्रान म्हणाले की, मला इंजेक्शन देऊन मारले जाऊ शकते.

दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे नेते शेख रशीद यांनीही मंगळवारी सांगितले की, 'त्यांच्या नेत्याची हत्या होऊ शकते.' इम्रान खान यांनी हत्येची भीती व्यक्त केल्यानंतर लष्कर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ते नाटक करत असल्याचे म्हटले असले तरी.

दुसरीकडे, बुधवारी इम्रान खान यांना इस्लामाबाद (Islamabad) पोलीस लाईनमध्येच स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. येथे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने सांगितले होते की, जमीन घोटाळ्याप्रकरणी इम्रान खान यांची चौकशी करण्यासाठी 14 दिवसांची कोठडी आवश्यक आहे.

त्यावर, न्यायालयाने सुनावणी घेऊन निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षांच्या नेत्यांवर पोलिसांची कारवाई सुरुच आहे.

इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते असद उमर यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. इतकेच नाही तर त्यांना अटक करण्यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे पीटीआय नेते शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT