Coronavirus Dainik Gomantak
ग्लोबल

Coronavirus: कोरोनाची पुन्हा दस्तक; हाँगकाँग-बँकॉकमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ, भारतासाठी धोक्याची घंटा?

Covid-19: पाच वर्षांपूर्वी जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढलंय. विशेषतः सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक आणि आग्नेय आशियातील काही देशांमध्ये कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीय.

Sameer Amunekar

पाच वर्षांपूर्वी जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढलंय. विशेषतः सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक आणि आग्नेय आशियातील काही देशांमध्ये कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या महिन्यात सिंगापूरमध्ये १४,२०० हून अधिक कोविड प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २८ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे, या वाढीमुळे सिंगापूरसह संपूर्ण आशिया खंडात पुन्हा एकदा कोविडची छाया गडद होताना दिसत आहे.

सिंगापूरमध्ये सध्या वाढणाऱ्या कोविड प्रकरणांमागे LF.7 आणि NB.1 हे व्हेरिएंट कारणीभूत आहेत. हे व्हेरिएंट JN.1 समूहातील असून, सध्या नोंदवण्यात येणाऱ्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त प्रकरणे या प्रकारांशी संबंधित आहेत. या व्हेरिएंटमुळे बाधितांमध्ये नाक वाहणे, घसा खवखवणे, ताप आणि सौम्य थकवा यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत.

आरोग्य यंत्रणा सतर्क

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले की, कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असली तरी स्थिती नियंत्रणात आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून, मागील आठवड्याच्या तुलनेत ती १०२ वरून १३३ पर्यंत गेली आहे.

मात्र, सद्यस्थितीत हे नवे व्हेरिएंट अधिक घातक किंवा जास्त संसर्गजन्य असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं.

भारतासाठी धोक्याची घंटा?

दरम्यान, भारतात सध्या कोरोनाचे केवळ ९३ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की भारतात कोविडच्या नव्या लाटेचे सध्या कोणतेही संकेत नाहीत. तरीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT