Kim Jong-un Dainik Gomantak
ग्लोबल

'एलियन्सपासून पसरतो कोरोना', किम जोंग उनचा अजब दावा

एलियन्समुळे कोरोना पसरत असल्याचा दावा किम जोंग यांनी केला आहे. किम जोंग उन म्हणाले की, देशातील पहिला कोरोनाचा रुग्णही एलियन्समुळे सापडला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना व्हायरसने परत जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची लाखो प्रकरणे अजूनही नोंदवली जात आहेत, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापर्यंत संपूर्ण जगामध्ये एक रहस्य आहे की हा विषाणू कसा आणि कुठून पसरला? या प्रश्नाचे नेमके उत्तर अद्याप कोणाकडे नाही.

आता इतके दिवस उलटून गेल्यानंतरही या विषाणूचे नेमके कारण शोधणे कदाचित शक्य नसल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, आता कोरोना व्हायरसबाबत उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांचे एक विचित्र विधान समोर आले आहे.

किम जोंग उन अनेकदा आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी कोरोनाबाबत असे वक्तव्य केले आहे, ज्याची जगभरात चर्चा होत आहे. एलियन्समुळे कोरोना पसरत असल्याचा दावा किम जोंग यांनी केला आहे. किम जोंग उन म्हणाले की, देशातील पहिला कोरोनाचा रुग्णही एलियन्समुळे सापडला आहे.

एलियन्सने दक्षिण कोरियाशी जोडलेल्या सीमेवरून फुग्यात विषाणू टाकला. तेव्हापासून देशात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. त्याचवेळी, उत्तर कोरियामध्ये एप्रिलमध्ये एक 18 वर्षीय सैनिक आणि 5 वर्षांच्या मुलाने 'एलियन सदृश वस्तू'ला स्पर्श केल्याची अफवा पसरली होती. यानंतर दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली.

तथापि, शेजारील दक्षिण कोरियाने एलियन स्प्रेडचा सिद्धांत खोडून काढला आहे. सोलमधील एका प्राध्यापकाचे म्हणणे आहे की किम जोंगच्या दाव्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कारण वस्तूंमधून विषाणू पसरण्याची शक्यता खूपच कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT