चीनच्या (China) आग्नेय प्रांतातील फुजियानमध्ये (Fujian) पुन्हा एकदा पसरला आहे. Dainik Gomantak
ग्लोबल

चीनच्या फुजियान भागात कोरोना कहर, एकाच शाळेतील 36 मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह

चीन (China) सरकारने मंगळवारी झियामेन विमानतळावरून उड्डाण करणारी 60% उड्डाणे रद्द केली. सिनेमा हॉल, सार्वजनिक वाहतूक यासह सर्व सार्वजनिक उपक्रम बंद करून शहराबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

चीनमध्ये (China) कोरोना (Covid-19) व्हायरस पुन्हा एकदा डोकेवर काढत असून, कोरोनाने चीनच्या (China) आग्नेय प्रांतातील फुजियानमध्ये (Fujian) पुन्हा एकदा पसरला आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननुसार (national health commission), फुजियान शहरातील पुतियन शहरात असलेल्या शाळेत 36 मुलांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये डेल्टा व्हेरिएंटची देखील प्रकरणे सापडली आहेत. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी लोकांना सिनेमा हॉल, सार्वजनिक वाहतूक यासह सर्व सार्वजनिक उपक्रम बंद करून शहराबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

13 सप्टेंबर रोजी फुजियानमध्ये कोरोना विषाणूची 59 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. तर याच्या एक दिवस आधी फक्त कोरोनाची 22 प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या 4 दिवसांत फुजियानच्या 3 शहरांमध्ये कोरोनाचे 102 रुग्ण आढळले आहेत. तेथे कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची प्रकरणे वाढत आहेत.

फुजियानमध्ये सिंगापूरहून परतलेल्या जोडप्यात डेल्टाचे पहिले प्रकरण आढळले आहे. असे सांगितले जात आहे की, त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाचा आणि अन्य विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही मुले पुतियन प्राथमिक शाळेत शिकतात. कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर ही शाळा नुकतीच उघडण्यात आली. सध्या प्रशासनाने ही शाळा बंद केली असून, येथे शिकणारी मुले आणि शाळेतील कर्मचारी यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.

चीन सरकारने मंगळवारी झियामेन विमानतळावरून उड्डाण करणारी 60% उड्डाणे रद्द केली. तसेच, पुतियन आणि झियामेन प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

आठवडाभर चालणारा राष्ट्रीय सुट्टी सप्ताह 1 ऑक्टोबरपासून चीनमध्ये सुरू होणार आहे. या दरम्यान, चिनी नागरिक देश आणि जगाला भेट देण्यासाठी बाहेर जातात. चीनच्या पर्यटन अर्थव्यवस्थेचाही तो एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आता कोरोनाची नवीन प्रकरणे आल्यानंतर राष्ट्रीय सुट्टी सप्ताहावरही परिणाम होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

PF खातेदारांसाठी आनंदाची बातमी! 8.25% व्याजदराला केंद्राचा 'हिरवा कंदील'; लाखो कर्मचाऱ्यांच्या बचतीत होणार भरघोस वाढ

Morjim Accident: भाड्याची 'थार' ठरली काळ...! मोरजी अपघातात महिलेचा मृत्यू, दोघे जखमी; हरियाणाचा चालक घटनास्थळावरुन फरार

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

SCROLL FOR NEXT