Bangladesh Padma Bridge Twitter
ग्लोबल

बांग्लादेशाला प्रगतीपथावर नेणारा अन् चिनी कंपनीने बनवलेला 'पद्मा पुल' 7 वर्षांनंतर तयार

पद्मा पुलामुळे बांगलादेशाचा भारतासोबतचा व्यवसाय वाढेल

दैनिक गोमन्तक

ढाका: जगात अनेक आश्चर्यकारक पूल बांधले गेले आहेत. त्यात आता बांगलादेशचेही नाव जोडले जाणार आहे. उद्या रविवारी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते पद्मा पुलाचे उद्घाटन होणार आहे. जगासाठी, तो एका सामान्य पुलासारखा आहे, ज्यामध्ये वर 6 लेनचा रस्ता आणि खाली रेल्वे ट्रॅक असतील. पण बांगलादेशसाठी हा पुल त्याच्या सुवर्ण भविष्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकणारे मार्ग ठरणार आहे. (Bangladesh Padma Bridge)

बांगलादेशातील हा सर्वात लांब आणि आव्हानात्मक पूल राष्ट्रीयत्वाचे प्रतीक मानला जात आहे. सुमारे 6 किमी लांबीचा हा पूल देशाच्या दक्षिण-पश्चिम भागांना मुख्य प्रवाहाशी जोडेल. यामुळे हालचाली सुलभ, व्यापारात तेजी आणि बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हा पूल सरकारसाठी इतका महत्त्वाचा आहे की त्याच्या पूर्ण कार्यान्वित झाल्यामुळे देशाच्या जीडीपीमध्ये 1.23 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

7 वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती

हा बहुउद्देशीय रेल्वे-रोड पूल, 6.15 किमी लांब आणि 21.65 मीटर रुंद, पद्मा नदीवर बांधला आहे, जी बांगलादेशातील सर्वात मोठी आणि धोकादायक नदी मानली जाते. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 21 वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी या पुलाची पायाभरणी केली होती. तेव्हापासून या पुलाला अनेक वादळांचा सामना करावा लागला आहे. यासाठी जागतिक बँकेने यापूर्वी 1.2 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली होती. परंतु बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सुमारे दशकभरापूर्वी ही योजना रद्द करण्यात आली होती. यानंतर बांगलादेशने स्वत:च्या पैशातून पुलाचे बांधकाम पुर्ण केले. 7 वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती, ते काम बांग्लादेशचे स्वप्न आज पूर्ण झाले. त्यावर सध्या फक्त वाहनांची ये-जा सुरू करण्यात येणार आहे. पुढील वर्षी मार्चपासून रेल्वे गाड्याही सुरू होण्याची शक्यता आहे.

दक्षिण-पश्चिम भाग ढाकाशी जोडले जातील

रस्ते वाहतूक सुरू झाल्यामुळे, पश्चिमेकडील खुलना, जेसोर आणि बरिसाल ही क्षेत्रे थेट राजधानी ढाकाशी जोडली जातील. पद्मा नदीमुळे बांगलादेशच्या दक्षिण-पश्चिम भागांना वेगळे राहावे लागले, जे आता मुख्य प्रवाहात सामील होण्यास तयार आहेत. तेथे राहणाऱ्या सुमारे 3 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. येथे रेल्वे सेवा सुरू झाल्यावर भारतातील कोलकाता ते ढाका हे अंतर अवघे साडेतीन तासांचे असेल. यामुळे भारतासोबतचा व्यवसाय तर वाढेलच, शिवाय मैत्री एक्स्प्रेसच्या माध्यमातून प्रवासी सहज आणि लवकर पोहोचू शकतील.

पुलावरून अनेक वाद झाले

हा पुल ढाक्यापासून सुमारे 40 किमी दक्षिणेला बांधलेल्या या पुलावरून अनेक वाद झाले आहेत. त्याच्या बांधकामात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. जागतिक बँकेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा (BRI) भाग असल्याचा आरोपही करण्यात आला. कारण हा पूल चीनच्या सरकारी चायना रेल्वे ग्रुपशी संलग्न असलेल्या कंपनीने बांधला आहे. चीनच्या बीआरआय प्रकल्पांवर भारताकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच स्पष्ट केले की पद्मा पूल बीआरआयचा भाग नाही. हे पूर्णपणे बांगलादेश सरकारच्या पैशातून बनवला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT