Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: इम्रान खान यांच्या पक्षातील वाद चव्हाट्यावर

इम्रान खान यांचे सरकार 9 एप्रिलच्या रात्री उशिरा पडले.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान मधील इम्रान खान यांचे सरकार पडताच त्यांचा राजकीय पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) मधील मतभेद उघडपणे दिसू लागले आहेत. पक्षाचे नेते परस्परविरोधी विधान करत आहेत. इम्रान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले शाह मेहमूद कुरेशी आणि माजी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी एका मुद्द्यावर आमनेसामने आले आहेत. (Conflict in Imran Khan's political party)

वास्तविक, इम्रान खान यांचे सरकार 9 एप्रिलच्या रात्री उशिरा पडले. संसदेत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी, 10 एप्रिल रोजी दुपारी, पीटीआय नेते फवाद चौधरी आणि अवामी मुस्लिम लीगचे अध्यक्ष, शेख रशीद यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. यादरम्यान दोघांनी दावा केला होता की त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

फवाद चौधरी आणि शेख रशीद यांच्या संध्याकाळी पत्रकार परिषदेनंतर पीटीआयचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या सर्व सदस्यांनी अद्याप संसदेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला नाही. पाकिस्तानी (Pakistan) वाहिनी एआरवाय न्यूजच्या एका कार्यक्रमात कुरेशी म्हणाले की, इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी पीटीआयचे उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांच्यासमोर त्यांचे नाव निश्चित करणे योग्य आहे का, यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच, सध्याच्या परिस्थितीत पक्षाने संसदेत राहावे की नाही? यावरही चर्चा झाली. मात्र, या विषयावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

पक्षाच्या नॅशनल असेंब्ली सदस्यांच्या सामूहिक राजीनाम्याबाबत कुरेशी म्हणाले की, इम्रान खान (Imran Khan) यांना जे हवे आहे ते होईल. ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य होईल. आमचा पक्ष लोकशाहीवादी आहे. सर्वांचे मत ऐकूनच इम्रान निर्णय घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; घराबाहेर आले...पोलिस घेऊन गेले...!

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Zenito Cardozo Case: शिरदोन गँगवॉर प्रकरण! जेनिटोला ‘सुप्रीम’ दिलासा; 3 वर्षांच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

SCROLL FOR NEXT