Pakistan: 'चौकीदार चोर है' घोषणाबाजी करत इम्रान खान समर्थक रस्त्यावर

इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यामागे पाकिस्तानचे लष्कर आणि लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचा हात असल्याचे मानले जात आहे.
Imran Khan supporters protesting across Pakistan
Imran Khan supporters protesting across PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. आज शेजारच्या देशात नवा पंतप्रधान निवडला जाणार आहे, मात्र त्याआधीच इम्रान समर्थकांची रस्त्यावर गर्दी झाली आहे. इम्रान खान यांना पुन्हा पंतप्रधान करावे, या मागणीसाठी इम्रानचे लाखो समर्थक कराचीपासून लाहोरपर्यंत निदर्शने करत आहेत. (Imran Khan supporters protesting across Pakistan)

Imran Khan supporters protesting across Pakistan
Russia-Ukraine War PM मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांची आज महत्त्वाची वर्चुअल बैठक

अशाच एका रॅलीत 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे शेख रशीद रविवारी रावळपिंडीत एका सभेला संबोधित करत होते. त्यात 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देण्यात आल्या. लष्कराच्या (Army) विरोधात या घोषणा दिल्या जात आहेत.

इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यामागे पाकिस्तानचे लष्कर आणि लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचा हात असल्याचे मानले जात आहे. भाषणादरम्यान काही वेळाने शेख रशीद यांनी जनतेला अशा घोषणा न देण्याचे आवाहन केले, त्यानंतर जनता शांत झाली.

Imran Khan supporters protesting across Pakistan
असं झालं तर पीटीआयचे सर्व खासदार राजीनामा देतील; फवाद चौधरी यांचे वक्तव्य

पाकिस्तानातील (Pakistan) जनतेचा एक मोठा वर्ग आहे ज्याला इम्रान खान यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे. सध्या इम्रान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ची पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. सध्या इस्लामाबाद, कराची (Karachi), पेशावर, मलाकंद, मुलतान, खैबर, झांग आणि क्वेटा येथे विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.

इमरानने समर्थकांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, हा एक ऐतिहासिक जमाव आहे, जो 'बदमाशांच्या' नेतृत्वाखालील सरकारला विरोध करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com