Myanmar Dainik Gomantak
ग्लोबल

म्यानमार लष्कराचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी घेतले स्वतःला कैद करुन !

म्यानमारमध्ये (Myanmar) शुक्रवारी लष्करी राजवटीच्या विरोधात अनोख्या पद्धतीने निदर्शने झाली.

दैनिक गोमन्तक

म्यानमारमध्ये (Myanmar) शुक्रवारी लष्करी राजवटीच्या (Military Rule) विरोधात अनोख्या पद्धतीने निदर्शने झाली. लोकांनी स्वतःला घरात कैद करुन निषेध केला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त (International Human Rights Day) या निषेधाला 'मूक संप' असे नाव देण्यात आले. या निदर्शनात संपूर्ण देश एकत्र दिसत होता. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत लोक आपापल्या घरातच होते. दुकाने बंद होते आणि रस्त्यावर शांतता होती.

दरम्यान, मंगळवारी देशाच्या सागिंग भागात सैनिकांनी कथितरित्या ठार झालेल्या 11 नागरिकांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या नागरिकांचे जळालेले मृतदेह ग्रामस्थांना आढळून आले होते. तसेच या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, सैनिकांनी नागरिकांची हत्या केली नसल्याचे स्पष्टीकरण लष्कराने दिले आहे. लष्कराने या घटनेला खोटे ठरवले असून इंटरनेट दाखवण्यात आलेली माहिती खोटी असून लष्कराला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले

म्यानमारचे हुकूमशहा लष्कर आपल्याच देशातील नागरिकांची कत्तल करत आहे. या क्रमाने, लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून, सैनिकांनी देशाच्या उत्तर-पश्चिम भागातील सागिंग भागातील डोने तव गावात छापा टाकला. काही गावकऱ्यांना पकडून लष्कराने त्यांचे हातपाय बांधून त्यांना जिवंत जाळले. या तोडफोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गावकऱ्यांना मारून जाळून टाकल्यानंतर लगेचच ती छायाचित्रे काढण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, या फोटो आणि व्हिडीओबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. मंगळवारच्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये 11 गावकऱ्यांचे जळालेले मृतदेह दिसत आहेत. त्यापैकी काही किशोरवयीनही होते, असे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT