Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

Sperm Bank: ना रक्त, ना पैसे; चीनच्या एका युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांना केलं अजब दान करण्याचे आवाहन

बीजिंग आणि शांघायमधील अनेक प्रजनन क्लिनिक्सनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्यासाठी आणि चीनच्या घटत्या प्रजनन दराचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Pramod Yadav

चीनच्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिकत असताना कमावण्यास मदत करण्यासाठी, देशातील अनेक शुक्राणू बँकांनी ऑफर केली आहे. चीनमधील प्रजनन दर कमी होत असल्याने त्यांना मदत करण्यासाठी शुक्राणू दान करण्याचे आवाहन केले आहे.

चीनच्या अधिकृत मीडिया ग्लोबल टाईम्सने ही माहिती दिली आहे. चिनी सोशल मीडिया साइट विवो ही बातमी प्रसिद्ध करत आहे. अनेक क्लिनिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्यास सांगितले आहे.

बीजिंग आणि शांघायमधील अनेक प्रजनन क्लिनिक्सनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्यासाठी आणि चीनच्या घटत्या प्रजनन दराचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

चीनमध्ये काही काळापासून प्रजनन दरात लक्षणीय घट झाली आहे. चीनच्या Vivo या सोशल मीडिया साइटवर आजकाल अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. 1 आठवड्यात 24 कोटींहून अधिक लोकांनी स्पर्म बँक आणि स्पर्म डोनेशनशी संबंधित पोस्ट पाहिल्या आहेत.

दोन फेब्रुवारी रोजी चीनच्या नैऋत्य चीनमधील शुक्राणू बँकेने प्रथम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शुक्राणू दानाचे आवाहन केले. या आवाहनामध्ये शुक्राणू दानाचे फायदे, नोंदणीसाठीची अट, सबसिडी आणि शुक्राणू दानाची प्रक्रिया सविस्तरपणे सांगितली आहे.

विद्यार्थ्यांनी पुढे येऊन शुक्राणू दान करावे. चीनमधील सरकार शुक्राणू दानाला प्रोत्साहन देण्यात व्यस्त असल्याची चर्चा लोकांमध्ये जोर धरू लागली आहे. सन 2022 मध्ये चीनच्या लोकसंख्येमध्ये कमजोरी आली आहे. चीनची लोकसंख्या गेल्या सहा दशकांत पहिल्यांदाच कमी झाली आहे. यामुळे आगामी काळात नोकरदार तरुणांची संख्या कमी होऊन सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT