Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Chinese Girl Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज अनेक धक्कादायक आणि विचित्र व्हिडिओ समोर येतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Manish Jadhav

Chinese Girl Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज अनेक धक्कादायक आणि विचित्र व्हिडिओ समोर येतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये एक पोरगी जिवंत कोळंबीला खाण्याचा प्रयत्न करत असताना तिला चांगलाच धडा मिळतो. या घटनेने केवळ दर्शकांना धक्काच बसला नाही, तर प्राण्यांवरील क्रूरतेबद्दलही एक मोठी चर्चा सुरु झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी घटना चीनमध्ये (China) घडल्याचे सांगितले जात आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमधील धक्कादायक दृश्य

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एक पोरगी एका रेस्टॉरंटमधील टेबलवर बसलेली दिसत आहे. तिच्या प्लेटमध्ये एक मोठी जिवंत कोळंबी ठेवलेली आहे. सुरुवातीला ती कोळंबीला पकडून खाण्यासाठी आपल्या प्लेटमध्ये घेण्याचा प्रयत्न करते, पण ती अचानक हलू लागते, त्यामुळे घाबरुन ती तिला सोडून देते. तरीही न थांबता, ती पुन्हा एकदा कोळंबी खाण्याचे धाडस करते. यावेळी ती चॉपस्टिक्सच्या सहाय्याने कोळंबीला पकडण्याचा प्रयत्न करते. पण याच क्षणी कोळंबी तिला जोरदार चावते. कोळंबीने बोटाला पकडताच ती पोरगी वेदनेने किंचाळू लागते आणि हात झटकून तिला दूर फेकते. तिचा हा अनुभव कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल झाला.

व्हिडिओची सुरुवात आणि यूजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडिओमध्ये 'रुरल लाइफ चायना' नावाचे टिक-टॉक (TikTok) अकाउंट दिसत असल्यामुळे हा व्हिडिओ चीनमधील असल्याचे मानले जात आहे. हा व्हिडिओ एक्स (X) प्लॅटफॉर्मवर @PicturesFoIder नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून त्याला लाखो लोकांनी पाहिले. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही यूजर्संनी पोरीला खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोळंबीने दिलेला हा 'धडा' योग्य असल्याचे म्हटले. एका युजरने लिहिले, "जेव्हा भरपूर भाज्या आणि इतर अन्नपदार्थ उपलब्ध आहेत, तेव्हा माणसे प्राण्यांना का खातात?" तर दुसऱ्या एका युजरने, "ती बिचाऱ्या प्राण्यासोबत असे वागण्याचा प्रयत्न करत होती, तिच्यासोबत हेच व्हायला हवे होते," अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी 'हाच खरा न्याय' असल्याचे म्हटले.

व्हिडिओमागचा नैतिक प्रश्न

दुसरीकडे, हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाचा विषय राहिला नाही, तर त्याने जीवंत प्राण्यांना खाण्याच्या प्रथेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे अन्न खाण्याची परंपरा आहे, परंतु या व्हिडिओने त्या परंपरांवर नैतिकता आणि क्रूरतेच्या दृष्टीने विचार करण्यास भाग पाडले आहे. काही यूजर्संनी हा व्हिडिओ विनोद म्हणून घेतला असला, तरी अनेक लोकांनी प्राण्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवला आहे. हा व्हिडिओ माणसाला निसर्गाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण शिकवणीची आठवण करुन देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळ 'Haunted' म्हणणाऱ्या ब्लॉगरला जामीन; न्यायालयाने पोलिसांनाच फटकारले

Canacona: पर्यटन व्यवसायातील कामगारांचे हित जपणार, काणकोणात मंत्री तवडकरांची ग्वाही

Valpoi Road Issue: होंडा येथील रस्त्यांची दुरवस्था, गावकरवाडा ते पोलिस स्टेशनपर्यंत दैना; नवरात्रीपूर्वी डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Live News: वेर्णा येथे एक रुग्णवाहिका, कार, महिंद्रा आणि एक ट्रक यांच्यात अपघात

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT