Missiles
Missiles Dainik Gomantak
ग्लोबल

चीनची धोकादायक चाल उघड! ड्रॅगनने शिपिंग कंटेनरमध्ये लपवले क्षेपणास्त्र

दैनिक गोमन्तक

चीन (China) गुप्तपणे विशिष्ट प्रकारची क्षेपणास्त्रे विकसित करत असल्याचा आरोप जगभरातून केला जात आहे. चीन ही क्षेपणास्त्रे (Missiles) शिपिंग कंटेनरमध्ये लपवून ठेवू शकतो जेणेकरुन त्यांची जगभरातील बंदरांमध्ये तस्करी करता येईल. तसेच ते कोणत्याही चेतावणीशिवाय लॉन्च केले जाऊ शकतात. द सनच्या वृत्तानुसार, जगातील महासागरांमध्ये चीनच्या जहाजांचा मोठा ताफा आहे. काही पाश्चात्य निरीक्षकांच्या मते, चीनने या क्षेपणास्त्रांचा विकास करणे म्हणजे युद्धनौकांचा नवीन ताफा विकसित करण्यासारखे आहे. हे कंटेनर सामान्य कंटेनरसारखे दिसतात, म्हणून ते इतर कंटेनरसह संग्रहित केले जाऊ शकतात आणि जगाच्या विविध भागात घेऊन जाऊ शकतात.

त्याचवेळी चीन ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या बंदरांपर्यंत पोहोचवून अचानक हल्ला करु शकतो. इंटरनॅशनल असेसमेंट अँड स्ट्रॅटेजी सेंटरचे रिक फिशर म्हणाले की, चिनी लोकांकडे स्टेल्थ मिसाइल असण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीन (US-China) आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या जगातील सर्वोच्च महासत्ता बनण्याच्या शर्यतीत आहेत. तैवानच्या (Taiwan) भवितव्याबाबत दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. जिथे चीन तैवानवर (China-Taiwan) कब्जा करण्याच्या इराद्याने बसला आहे, तिथे अमेरिकेने (America) बीजिंगपासून (Beijing) तैवानचे रक्षण करणार असल्याची शपथ घेतली आहे.

शस्त्रास्त्र मेळ्यात क्षेपणास्त्र प्रथम दिसले

नजरबंदी शिबिरांमध्ये दहा लाखांहून अधिक उइगर मुस्लिमांशी (Uyghur Muslims) गैरवर्तन केल्याबद्दल जगभरातून चीनचा निषेध करण्यात येत आहे. मात्र, बीजिंगने हे आरोप फेटाळून लावले आहेत. 2016 च्या शस्त्र मेळ्यात नवीन क्षेपणास्त्रांचा नमुना पाहण्यात आला होता. तेव्हापासून, त्याला आता सक्रियपणे तैनात केले जाऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे. फिशर म्हणाले की, चीनी कम्युनिस्ट पक्ष (Chinese Communist Party) आपल्या इच्छेनुसार अराजकता निर्माण करण्यासाठी कंटेनरयुक्त क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

शस्त्रे लोड करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन

कंटेनर जहाजातून क्षेपणास्त्र डागल्याचा एकमेव सार्वजनिक रेकॉर्ड म्हणजे इस्रायलने घेतलेल्या चाचणीचा फोटो. दरम्यान, स्टॉकटन सेंटर फॉर इंटरनॅशनल लॉ थिंक-टँकने (Stockton Centre for International Law) म्हटले आहे की, नागरी जहाजांवर गुप्तपणे शस्त्रे लोड करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असू शकते. एका अहवालात असे म्हटले आहे की व्यावसायिक जहाजांमध्ये चिनी क्षेपणास्त्रे गुप्तपणे लपविल्यामुळे नागरी जहाजांना धोका वाढतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Live News: मतदानाचा उच्चांक भाजपला घरी पाठविण्यासाठी!

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT