हिमालय सुद्धा भारताशी मैत्री थांबवू शकत नाही: चीनी परराष्ट्र मंत्री

भारत (India) आणि चीनने (China) एकमेकांना यशस्वी देश (Successful country) होण्यासाठी मदत करावी.
हिमालय सुद्धा भारताशी मैत्री थांबवू शकत नाही: चीनी परराष्ट्र मंत्री
हिमालय सुद्धा भारताशी मैत्री थांबवू शकत नाही: चीनी परराष्ट्र मंत्री Dainik Gomantak
Published on
Updated on

चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिसरी (Indian Ambassador Vikram Misari) यांच्या फेअरवेल व्हरचुयल बैठकीमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांनी सीमेवरील तणाव कमी होईल अशी आशा व्यक्त केली. आपण परस्पर सामंजस्य निर्माण केले पाहिजे,असे वांग यांनी बैठकीत सांगितले. चुकीचा निर्णय घेवू नका, आपण दूरदृष्टि ठेवून विचार केला पाहिजे आणि छोट्या गोष्टींनी विचलित होऊ नये. भारत (India) आणि चीनने (China) एकमेकांना यशस्वी देश (Successful country) होण्यासाठी मदत करावी.

एका अहवलाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार वांग यांनी म्हटले की जेव्हा आपण विश्वास निर्माण करू शकतो तेव्हा हिमालय (Himalaya) देखील आपली मैत्री थांबवु शकत नाही. पण एकदा विश्वास उडाला की डोगरांचे एक टोकसुद्धा आपल्यासोबत यायला पुरेसे नसते. चीन (China) आणि भारताने (India) एकमेकांवर आरोप करण्याएवजी परस्पर संमजपणा वाढवावा, असे त्यांनी म्हटले आहे.

हिमालय सुद्धा भारताशी मैत्री थांबवू शकत नाही: चीनी परराष्ट्र मंत्री
बीजिंग Winter Olympics वर 'अमेरिका' घालणार राजनयिक बहिष्कार

या बैठकीमध्ये मिसरी म्हणाले की, गेल्या वर्षीच्या काही आव्हानामुळे नात्यातील मोठ्या संधी नष्ट झाल्या होत्या. मात्र दोन्ही देश (Country) सध्याच्या अडचणीवर मात करून संबंध सकारात्मक दिशेने पुढे नेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. विक्रम मिसरी (Vikram Misari) यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत असून भारताने अद्याप चीनमधील (China) नवीन राजदूतांची घोषणा केलेली नाही. एप्रिल 2019 पासून लडाख सीमेवर (Ladakh Border) दोन्ही देशामधील तणाव कायम आहे. जून 2020 मध्ये विरोधाला हिंसक वळण लागले ज्यात दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले. या घटनेनंतर दोन्ही देशांनी सीमेवर सैन्याची (Military) तैनाती वाढवली आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही दोन्ही देश कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com