China Protest Dainik Gomantak
ग्लोबल

China Protest: चीनमध्ये नागरिकांचा लॉकडाऊनला विरोध, सरकारविरोधातील प्रदर्शनात 10 लोकांचा मृत्यू

चीनमध्ये सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन विरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली.

दैनिक गोमन्तक

चीनमध्ये (China) कोरोनाचा पुन्हा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे 30 हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र जनता लॉकडाऊन (Zero Covid Policy)विरोधात रस्त्यावर उतरली आहे. जनतेकडून लॉकडाऊन (Lockdown) हटवण्यासाठी प्रदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये अजूनही कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव कायम आहे. चीनमध्ये गेल्या सहा महिन्यांमधील विक्रमी कोरोना रुग्ण वाढ पाहायला मिळत आहे. बीजिंगमध्ये गुरुवारपासून रविवारपर्यंत दररोज सुमारे 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

दिवसेंदिवस हा आकडा वाढताना दिसत आहे. बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. त्यामुळे चीन सरकारने पुन्हा एकदा झिरो कोविड धोरण लागू करत अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लागू केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या शून्य कोविड धोरणालाही देशात विरोध होऊ लागला आहे. लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आहेत.

  • नागरिकांकडून सरकारविरोधात निदर्शनं, 10 जणांचा मृत्यू

नानजिंग आणि बीजिंगसह अनेक शहरांमधील विद्यापीठांमधील विद्यार्थी शांततापूर्ण निदर्शनांसाठी हातात कोरे कागद घेऊन दिसले. पण, त्यानंतर आंदोलन तीव्र झाले या आंदोलनात 10 जणांचा मृत्यू झाला. याचे अनेक फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशात कोरोना संसर्गाची प्रकरणं वेगाने वाढत आहेत आणि रविवारी एका दिवसात 40,000 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सलग चौथ्या दिवशी संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्यापासून ही संख्या सर्वाधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT