LAC  Dainik Gomantak
ग्लोबल

LAC वरुन चीनची भारताला तंबी

चीनी सैन्य गलवान खोऱ्यात (Galvan Valley) तैनात केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध चिघळायला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारत (India) आणि चीन (China) यांच्याच कॉर्प्स कंमाडर स्तरावरच्या चर्चेची 13 वी फेरी पार पडली आहे. मात्र चर्चेची ही फेरीही विफल ठरल्याने पूर्व लडाखमध्ये (East Ladakh) पुन्हा तणाव निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच ड्रॅगनने भारताल थेट धमकी दिल्याचे समोर आले आहे. चीनी सैन्य गलवान खोऱ्यात (Galvan Valley) तैनात केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध चिघळायला सुरुवात झाली आहे. मात्र तरीही सीमवेर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरुच आहेत. ड्रॅगनने मात्र यामध्ये अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आज दोन्ही देशांदरम्यान चर्चेची 13 वी फेरी झाल्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे.

चीनचा सरकारी वृत्त समूह असलेल्या ग्लोबल टाईम्समधून (Global Times) ड्रॅगनने भारताला धमकी दिल्याचे समोर आले आहे. भारताला पाहिजे तशी सीमा रेषा होणार नाही अशी भूमिका चीनने घेतली आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये युध्दाची परिस्थिती निर्माण झाल्यास भारत यामध्ये पराजित होईल अशी धमकी देखील चीनकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून गलवान खोरे, ग्रोगा हॉट स्प्रींग्स (Groga Hot Springs) आणि सीमेवरील वादग्रस्त ठिकाणांवरुन भारत आणि चीन सीमेवर संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता चर्चेची फेरी पार पडल्यानंतर चीनने घेतलेल्या भूमिकेवर भारताची रणनिती काय असणार हे पाहावं लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT