China Taiwan Tension Dainik Gomantak
ग्लोबल

China Taiwan Tension: चीननं तैवानला घेरलं! समुद्रात युद्धनौका अन् आकाशात फायटर जेट्स; युद्ध पेटणार?

China Taiwan Military Tension Update: तैवानच्या सागरी आणि हवाई क्षेत्राच्या आसपास चीनच्या लष्करी हालचाली सातत्याने वाढत असून यामुळे पूर्व आशियातील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला.

Manish Jadhav

China Taiwan Military Tension Update: तैवानच्या सागरी आणि हवाई क्षेत्राच्या आसपास चीनच्या लष्करी हालचाली सातत्याने वाढत असून यामुळे पूर्व आशियातील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या देशाच्या सीमेभोवती चीनची 2 लष्करी विमाने, 8 नौदल युद्धनौका आणि 4 सरकारी जहाजे घिरट्या घालताना शोधून काढली.

चीनच्या (China) पीपल्स लिबरेशन आर्मीच्या विमानांवर आणि जहाजांवर तैवानच्या सशस्त्र दलांनी अत्यंत बारीक नजर ठेवली असून, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपले नौदल आणि हवाई दलाला सज्ज केले. याच्या अवघ्या एक दिवसापूर्वी म्हणजेच शनिवारी देखील चीनची 5 लष्करी विमाने, 9 युद्धनौका आणि 5 सरकारी जहाजे तैवानच्या हद्दीत आली होती. त्यातील एका विमानाने तर तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडून तैवानच्या नैऋत्य हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केला, ज्याला तैवानच्या लष्कराने तातडीने प्रत्युत्तर दिले.

चीन आणि तैवानमधील हा वाद अनेक दशके जुना आहे. चीन तैवानला आपलाच एक अविभाज्य भाग मानतो आणि भविष्यात लष्करी बळाचा वापर करुनही त्याचे चीनमध्ये विलीनीकरण करण्याची भाषा करतो. याउलट, तैवान स्वतःला एक स्वतंत्र आणि लोकशाही राष्ट्र मानतो, ज्याची स्वतःची सरकार, सैन्य आणि मजबूत आर्थिक व्यवस्था आहे. चीनच्या या वाढत्या दबावाला तोंड देण्यासाठी तैवाननेही आपली संरक्षण क्षमता वाढवण्यास सुरुवात केली. याच महिन्यात तैवानच्या पहिल्या स्वदेशी पाणबुडीने काऊशुंग बंदरातून आपल्या सागरी चाचण्यांची पुढची फेरी यशस्वीपणे पूर्ण केली. ही या पाणबुडीची 15वी सागरी चाचणी आणि नववी डायव्हिंग चाचणी होती, ज्याला तैवानच्या सागरी सुरक्षा धोरणातील एक मोठा टप्पा मानले जात आहे.

तैवानच्या निर्मितीचा इतिहास पाहिला तर, 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जपानचा पराभव झाला, परंतु चीनमध्ये कुओमिंतांग (राष्ट्रवादी) आणि कम्युनिस्ट यांच्यात गृहयुद्ध सुरु झाले. माओ त्से तुंग यांच्या कम्युनिस्ट सैन्याने चिआंग काई-शेक यांच्या राष्ट्रवादी सैन्याला मागे हटण्यास भाग पाडले. अखेर 1 ऑक्टोबर 1949 रोजी माओ त्से तुंग यांनी बीजिंगमध्ये 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना'ची घोषणा केली. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी चिआंग काई-शेक यांनी त्यांच्या 20 लाख समर्थकांसह तैवान बेटावर आश्रय घेतला आणि तिथे 'रिपब्लिक ऑफ चायना' या नावाने नवीन सरकार स्थापन केले, जे आज तैवान म्हणून ओळखले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

British PM Resigns: ब्रिटनमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! पंतप्रधान कीर स्टारमर यांनी केली राजीनाम्याची घोषणा; काय घडलं अचानक?

LIVE मॅचदरम्यान आकाशातून वीज कोसळली, एका खेळाडूचा जागीच मृत्यू; अनेकजण जखमी

Goa Badminton: बॅडमिंटन कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा; अखिल गोवा बॅडमिंटन स्पर्धेत शाहीन-सुफियाची चमक, अंतिम फेरीत दाखल

Goa Ranji Cricket Team: गोव्याच्या रणजी संघासाठी लवकरच नवा 'प्रशिक्षक', गतमोसमातील मिलाप मेवाडा अनुपलब्ध; नियुक्तीबाबत 'GCA'त विचारमंथन

VIDEO: अमेरिकेला डावललं अन् पाकड्यांना जवळ केलं! कतारच्या PM चा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT