COVID-19  Dainik Gomantak
ग्लोबल

चीन, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ

शांघायमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्यानंतर चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शहरातील अडीच कोटींहून अधिक लोक सध्या त्यांच्या घरात बंद आहेत. याशिवाय चीनच्या जिलिन प्रांतासह इतर अनेक शहरांमध्ये देखील कोरोनाचा झपाट्याने प्रसार सुरू आहे. देशात 2020 सारखे वातावरण पहायला मिळत आहे.

स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शांघाय आणि आजूबाजूचे भाग सोमवार ते शुक्रवार या कालावधीत बंद राहतील. लॉकडाऊनच्या (Lockdown) दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारपासून शहरात पाच दिवस संचारबंदी असणार आहे. लोकांना घरातच राहावे लागेल. कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापने बंद राहतील आणि सार्वजनिक वाहतूक सेवा देखील निलंबित राहतील.

शांघाय डिस्ने पार्क आधीच बंद करण्यात आले आहे. चीनमध्ये या महिन्यात 56,000 हून अधिक संक्रमित लोक आढळल्यानंतर सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. हंगपू नदीला लागून असलेल्या शहरात नऊ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यापूर्वी, सरकार येथे लॉकडाऊन लागू करण्यास नकार देत होते. चीनमध्ये (China) गेल्या 24 तासांत 1,219 प्रकरणे समोर आली आहेत.

दक्षिण कोरिया आणि हाँगकाँगमध्येही गंभीर परिस्थिती
सोमवारी, दक्षिण कोरियामध्ये (South Korea) 24 तासांच्या कालावधीत संसर्गाची 1,87,213 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशातील गंभीर रुग्णांची संख्या सध्या 1,273 च्या विक्रमी पातळीवर आहे. हाँगकाँगमध्ये एका दिवसात 7,685 नवीन रुग्ण आढळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral: महाराष्ट्र पोरका झाला! 'अजित दादा' अनंतात विलीन; मुख्यमंत्री सावंतांनी साश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली

Goa Water Issue: पर्यटन नगरीत जलसंकटाची चाहूल; राज्यातील 59% जलस्रोत प्रदूषित तर 39 तलाव 'सर्वात खराब' श्रेणीत

श्वास कोंडणाऱ्या 'त्या' घटनेचा हिशोब होणार! कुंकळ्ळी अमोनिया गळतीप्रकरणी सुनावणी सुरु होणार; औद्योगिक सुरक्षेशी खेळणाऱ्यांना दणका

नुवे घरफोडी प्रकरण! कुख्यात 'पारधी गँग'चा गुंड अर्जुन गायकवाडच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ; अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे उलगडणार?

Goa Tourists Manali Trip: मनालीत गोमंतकीय पर्यटकांची मृत्यूशी झुंज! 48 जणांची सुखरुप सुटका; 'श्रीपाद भाऊं’चा मायेचा आधार

SCROLL FOR NEXT