Ebola Virus dainik gomantak
ग्लोबल

Ebola Virus: चिनी शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये बनवला इबोला व्हायरसचा खरतनाक ‘म्यूटंट’

Ebola Virus: चीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चीनी शास्त्रज्ञांनी नवा विषाणू तयार केला आहे.

Manish Jadhav

Ebola Virus: चीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चीनी शास्त्रज्ञांनी नवा विषाणू तयार केला आहे. इबोला रोगाचा आणि त्याच्या लक्षणांचा अभ्यास करण्यासाठी इबोला विषाणूच्या काही भागांचा वापर करुन शास्त्रज्ञांनी नवा एक विषाणू तयार केला आहे. हेबेई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील प्रयोगाचा डिस्क्रिप्शन देणारा अभ्यास सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित झाला आहे. शास्त्रज्ञांनी अभ्यासात नमूद केले की, त्यांनी हॅमस्टरच्या एका ग्रुपला प्राणघातक विषाणूचे इंजेक्शन दिले. मात्र ते तीन दिवसांत मरण पावले. त्यांनी अभ्यासात पुढे स्पष्ट केले की, हॅमस्टर्समध्ये मानवी इबोला रुग्णांसारखे गंभीर आजार दिसून आले, ज्यामध्ये मल्टी ऑर्गनचाही समावेश होतो."

दरम्यान, अभ्यासासाठी चिनी शास्त्रज्ञांच्या टीमने संसर्गजन्य हॅमस्टर (Hamster) प्राण्याचा वापर केला. त्याचबरोबर इबोलामध्ये आढळणारे एक प्रोटीन जोडले, जे विषाणूच्या पेशींना (Cell) संक्रमित करते आणि संपूर्ण मानवी शरीरात पसरवते.

शास्त्रज्ञांनी सांगितले

इंजेक्शननंतर काही हॅमस्टरच्या डोळ्यांच्या बाहुल्यांमधून स्त्राव येऊ लागला, ज्यामुळे त्यांची दृष्टी खराब झाली. शास्त्रज्ञांनी सांगितले की, त्यांचे लक्ष्य योग्य पशु मॉडेल शोधणे आहे, जे प्रयोगशाळेच्या सेटिंगमध्ये इबोलाच्या लक्षणांची नकल करु शकेल. इबोला सारख्या विषाणूंना सुरक्षितता स्तर 4 (BSL-4) पूर्ण करणाऱ्या सुरक्षित सुविधांची आवश्यकता असते. जगभरातील प्रयोगशाळा BSL-2 आहेत. चीनी शास्त्रज्ञांनी वेसिक्युलर स्टोमाटायटीस व्हायरस (VSV) नावाचा वेगळ्या व्हायरसचा प्रयोग केला, ज्याला आपण ग्लायकोप्रोटीन (GP) ही म्हणू शकतो. जो व्हायरसला सेलमध्ये प्रवेश करु देतो.

अभ्यास यशस्वी झाला

त्यांनी मृत प्राण्याचे अवयव कापले असता त्यांना हृदय, यकृत, प्लीहा, फुफ्फुसे, मूत्रपिंड, पोट, आतडे आणि मेंदूमध्ये विषाणू जमा झाल्याचे आढळले. यावरुन त्यांनी अभ्यास यशस्वी झाल्याचेही सांगितले.

2014 मध्ये अनेक पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये संसर्ग

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, 2014 ते 2016 दरम्यान अनेक पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये जगातील सर्वात मोठ्या इबोला संसर्गाची नोंद झाली होती.

काय आहे इबोला व्हायरस?

इबोला व्हायरस रोग हा एक गंभीर संसर्गजन्य रोग आहे, जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीचे रक्त, शरीरातील द्रव किंवा स्राव (विष्ठा, मूत्र, लाळ, वीर्य) यांच्या संपर्कातून संसर्ग पसरतो, परंतु लक्षणे दिसल्यानंतरच. इबोला हवेतून पसरत नाही. या आजारात मृत्यूचे प्रमाण सामान्यतः खूप जास्त असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ ODI Series: 'हिटमॅन', 'रन मशीन'सह टीम इंडियाची फौज सज्ज, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी पाहा कोणाची आकडेवारी किती दमदार

Airfare Ticket Price New Rules: विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आता विमान कंपन्या स्वतः ठरवणार तिकिटांचे दर; सरकारी नियंत्रण हटले

Rajasthan Jhunjhunu Accident: भीषण दुर्घटना! रस्त्याचे काम करताना 11,000 व्होल्टच्या विजेचा धक्का; 8 मजुरांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

Gajkesari Rajyog 2026: गुरु-चंद्राची युती घेऊन आली सुवर्णयोग! चार राशींचे भाग्य उजळणार; गजकेसरी योग ठरणार वरदान

8th Pay Commission Pension Hike 2026: पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग ठरणार वरदान, 67 टक्के पेन्शन आणि 50 टक्के फॅमिली पेन्शनची जोरदार मागणी; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT