China Manufacturing Dainik Gomantak
ग्लोबल

China Economic Growth Rate: चीनी अर्थव्यवस्थेला मोठा फटका, 50 वर्षांतील दुसऱ्या...!

China Economic Growth Rate: गेल्या वर्षी चीनमध्ये कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, रिअल इस्टेटमध्ये प्रचंड मंदी आली.

दैनिक गोमन्तक

China Economic Growth Rate: गेल्या वर्षी चीनमध्ये कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, रिअल इस्टेटमध्ये प्रचंड मंदी आली. त्याचाच परिणाम म्हणून आर्थिक विकास दर 3 टक्क्यांपर्यंत घसरला. मात्र, निर्बंध हटल्यानंतर त्यात हळूहळू सुधारणा होत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर एका वर्षात 2.9 टक्क्यांवर घसरला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निर्बंध उठवल्यानंतर शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) लोकांची उपस्थिती हळूहळू वाढत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेची वाईट स्थिती

सरकारच्या म्हणण्यानुसार, कोरोना संसर्गाची लाट ओसरु लागली आहे. चीनचा गेल्या वर्षीचा आर्थिक विकास दर 2021 च्या 8.1 टक्क्यांच्या निम्म्याहून कमी होता. कोरोना महामारीमुळे जगाची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनमध्ये लादण्यात आलेले निर्बंध आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी यामुळे गेल्या वर्षी चीनचा (China) आर्थिक विकास दर 2022 मध्ये 3 टक्क्यांवर आला होता. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील 50 वर्षांतील ही दुसरी सर्वात कमी वाढ आहे.

शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंटमध्ये लोकांची उपस्थिती वाढली

नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये चीनचा जीडीपी 1,21,020 अब्ज युआन किंवा $17,940 अब्ज होता. चीनचा जीडीपी विकास दर 5.5 टक्क्यांच्या अधिकृत लक्ष्यापेक्षा खूपच कमी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निर्बंध उठवल्यानंतर शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंटमध्ये लोकांची उपस्थिती हळूहळू वाढत आहे. त्याचवेळी, सरकारच्या (Government) म्हणण्यानुसार, असे दिसते की, संसर्गाची सध्याची लाट निघून गेली आहे. यापूर्वी 1974 मध्ये चीनचा विकास दर 2.3 टक्के होता.

लक्षणीय बाब म्हणजे, या वर्षी चीनचा डॉलर मूल्यातील जीडीपी दर 2021 मध्ये $18,000 अब्ज डॉलरवरुन 17,940 अब्ज डॉलरवर आला आहे. चिनी चलनाच्या (RMB) तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे हे घडले. RMB (RMB) मध्ये चीनची अर्थव्यवस्था 2022 मध्ये 1,21,020 अब्ज युआन होती, जी 2021 मध्ये 1,14,370 अब्ज युआन होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT