China President Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

China President Xi Jinping: शी जिनपिंग नजरकैदेत? चीनमध्ये चर्चेला आलं उधाण

China: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना चिनी लष्कराने नजरकैदेत ठेवल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

China President Xi Jinping: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना चिनी लष्कराने नजरकैदेत ठेवल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या प्रमुखपदावरुन हटवल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे अनेक चिनी सोशल मीडिया हँडलर्सचे म्हणणे आहे. याप्रकरणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही ट्विट करत या अफवेवर पडदा टाकावा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे खरोखरच नजरकैदेत आहेत का?

खरंतर, #xijinping हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांना नजरकैदेत ठेवून पीएलएने सत्तापालट केल्याची चीनमध्ये चर्चा आहे. न्यूज हायलँड व्हिजनच्या आणखी एका अहवालात असे म्हटले आहे की, चीनचे माजी अध्यक्ष हू जिंताओ आणि चीनचे माजी पंतप्रधान वेन जियाबाओ यांच्या आदेशानुसार चीनचे (China) अध्यक्ष नजरकैदेत आहेत, ज्यांनी स्थायी समितीचे माजी सदस्य सॉंग पिंग यांची चीनच्या सेंट्रल गार्ड ब्युरोमध्ये नियुक्ती केली होती.

दरम्यान, या चर्चांना उधाण आले जेव्हा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी ट्विट करत म्हटले की "चीनबद्दल एक नवीन अफवा आहे, जी शी जिनपिंग नजरकैदेत आहेत की नाही याची चौकशी केली पाहिजे? असे मानले जाते की जिनपिंग समरकंदमध्ये होते, तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी त्यांना लष्करप्रमुख पदावरुन हटवलं. त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची अफवा पसरली आहे," स्वामींनी त्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

अहवाल काय आहे

खरंतर, अहवालात असेही म्हटले आहे की, शी जिनपिंग SCO बैठकीसाठी समरकंदहून परतल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी विमानतळावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. असे व्हिडिओ सोशल मीडियावरही (Social Media) व्हायरल होत आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे उघड व्हायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT