China Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये जबरदस्तीने होणार गर्भधारणा, घसरलेला जन्मदर सावरण्यासाठी 'ड्रॅगन' सक्त

जन्मदरात घट झाल्याने जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

जन्मदरात घट झाल्याने जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. लोक वृद्ध होत असून तरुणांची कमतरता भासत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत कामगारांची मोठी कमतरता भासू शकते. जन्मदरातील घसरणीतून सावरण्यासाठी चीन सक्तीच्या गर्भधारणेच्या धोरणाकडे वळण्याची दाट शक्यता आहे. या रणनीतीअंतर्गत चीन लोकांना मुले जन्माला घालण्यास भाग पाडू शकतो. (China May Turn To Forced Pregnancy To Tackle Negative Population Growth Report)

दरम्यान, घटत्या जन्मदरामुळे हैराण झालेल्या चीनने आपल्या नागरिकांवर लवकर लग्न करावे आणि प्रति व्यक्ती किमान तीन मुले व्हावीत यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. जिओपॉलिटिकाच्या अहवालानुसार, लोकांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने विविध प्रकारच्या स्पर्धाही सुरु केल्या आहेत. मुले न होण्यामागचे कारण म्हणजे त्यांची काळजी.

तसेच, चीनमधील (China) बहुतेक पालकांचा दावा आहे की, आम्ही मुलांच्या कल्याणासाठी आणि काळजी घेण्यासाठी पुरेशा आर्थिक सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाहीत. कारण कोरोना महामारीमुळे क्वारंटाइन आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) आम्ही खूप तणावाखाली आहोत. हाँगकाँग (Hong Kong) पोस्टच्या अहवालानुसार, घरांमध्ये बंदिस्त राहण्याची सक्ती, अन्नाची कमतरता, उत्पन्नाचा अभाव, वाढत्या किंमती, आरोग्य समस्या इत्यादींमुळे देशातील लोकांचा भ्रमनिरास झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT