Shehbaz Sharif Dainik Gomamntak
ग्लोबल

Pakistan: शाहबाज शरीफ म्हणाले, 'चीन ईस्ट इंडिया कंपनी नाही'

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ 24 जून रोजी बलुचिस्तानमधील ग्वादर दौऱ्यावर होते.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ 24 जून रोजी बलुचिस्तानमधील ग्वादर दौऱ्यावर होते. आपल्या भेटीदरम्यान, त्यांनी बलुचिस्तानच्या नागरिकांना विकासासाठी या प्रदेशात गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसंबंधीचे आवाहन केले आहे. China Is Pakistan Closest Friend Not East India Company Says Shehbaz Sharif

बलुचिस्तानचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारची

बलुचिस्तानच्या समस्यांबाबत शाहबाज म्हणाले की, 'स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवणे ही सरकारची जबाबदारी आहे.' मच्छीमारांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असेही ते म्हणाले. स्थानिक जनतेचे प्रश्न सोडविल्याशिवाय राज्याचा विकास निरर्थक असल्याचे शरीफ म्हणाले.

चीन ही ईस्ट इंडिया कंपनी नाही, असे शाहबाज म्हणाले

चीन हा पाकिस्तानचा (Pakistan) सर्वात जवळचा मित्र असल्याचे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. चीन आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात साम्य नाही. राजनैतिक आणि आर्थिक पातळीवर चीनने (China) पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दिला आहे. पाकिस्तान आणि विशेषत: बलुचिस्तानच्या विकासात चीनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बलुचिस्तानमध्ये चिनी प्रकल्पांना लक्ष्य केले जात आहे

ग्वादर हे बलुचिस्तानच्या (Balochistan) स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लडाख्यांचे केंद्र राहिले आहे. गेल्या काही वर्षांत या भागात चिनी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे दहशतवादी गटांकडून चिनी संबंधित प्रकल्प आणि चिनी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT