पंजाब आणि इस्लामाबाद पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या ( PTI) नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री शिरीन मजारी यांना त्यांच्या घराबाहेरुन अटक केली आहे. पीटीआय नेते इफ्तिखार दुर्रानी यांनी शिरीन मजारी यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना कोहसर पोलीस ठाण्यात पोहोचण्याचे आवाहन केले आहे. Pakistan Tehreek e Insaf leader and former Union Minister Shirin Mazari has been arrested by police
पोलीस काय म्हणाले?
या प्रकरणाबाबत इस्लामाबाद (Islamabad) पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, डीजी खान येथे नोंदवलेल्या मालमत्तेच्या प्रकरणात शिरीन मजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्र्याची इस्लामाबादमधील कोहसार पोलीस ठाण्यातून डीजी खान येथे बदली करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, डीजी खानमधील 129 एकर जमिनीच्या वादावरुन शिरीन मजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वारंवार विनंती करुनही त्या हजर झाल्या नव्हत्या.
पोलिसांनी अधिकाऱ्यांनी माझ्या आईला मारहाण केली: इमान झैनब मजारी
पत्रकारांशी बोलताना मजारी यांची मुलगी इमान झैनाब मजारी-हाजीर हिने यास दुजोरा दिला. त्या म्हणाल्या की, 'माझ्या आईला पोलिस अधिकाऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिस (Police) त्यांना जबरदस्तीने घेऊन गेले.' झैनब यांनी शाहबाज सरकारला इशारा दिला की, 'जर आपल्या आईला काही झाले तर मी कोणालाही सोडणार नाही. माझ्या आईला कोणतीही पूर्व कल्पना न देता अटक करण्यात आली आहे.'
इम्रान खान संतापले
या प्रकरणाबाबत, पीटीआय नेते आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले की, 'आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या शिरीन मजारी यांचे फॅसिस्ट राजवटीने कथितपणे त्यांच्या घराबाहेरुन अटक केली. शिरीन खंबीर आणि निडर आहेत.'
इम्रान खान (Imran Khan) पुढे म्हणाले की, 'आमचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आहे. परंतु हे फॅसिस्ट सरकार देशाला अराजकाकडे ढकलू इच्छित आहे. त्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणायला हवी होती पण आता निवडणुका टाळण्यासाठी त्यांना अराजक हवे आहे. आज आम्ही आंदोलन करणार असून बैठकीनंतर लाँग मार्चची घोषणा केली जाणार आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.