China is likely to support the Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

चीनचा तालिबानला पाठींबा? जगासाठी ठरु शकते डोकेदुखी

Afghanistan: तालिबान (Taliban) सत्तेत आल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) या सर्व प्रकरणात काय भुमिका घेतो हे देखील महत्वाची असणार आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) काना-कोपऱ्यांमध्ये होणाऱ्या अतिरेकी कारवायांमधून समोर येणाऱ्या तालिबानने (Taliban) आता थेट देशाची राजधानी काबुल (kabul) पर्यंत पोहोचत, थेट राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी काल देश सोडून पलायन केल्यानंतर देश आता तालिबान्यांच्या ताब्यात गेला, या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसुन येतय. या सर्व वातावरणातच चीन या प्रकरणावर काय भुमिका घेणार, याकडे सर्व जगाचे लक्ष लागुन असतानाच चीनने तालिबानसोबत मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

तालिबानने सुरु केलेल्या सत्तासंघर्षाबद्दल चीनने शांत राहण्याची भुमिका घेतल्याचे पहायला मिळाले आहे. अफगाणिस्तानच्या शेजारीच असणारा चीन या प्रकरणावर काय भुमिका घेतो यावर अनेक गोष्टी अवलंबुन असणार आहेत. महासत्ता होण्याच्या प्रयत्नात असेलेल्या चीनचे अमेरिकेशी असलेली स्पर्धा हा सर्व घडामोडींमधला महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे चीनने तालिबानशी मैत्रीपुर्ण संबंध जर प्रस्थापित केले तर तो, अमेरिका, भारत आणि जगासाठी डोकेदुखी ठरु शकते.

तालिबान सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानची भुमिका देखील महत्वाची असणार आहे. चीन, पाकिस्तान आणि तालिबान हे तीघे जर एकत्र आले तर भारतासह ही जगासाठी धोक्याची घंटा ठरु शकते.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये सध्या मोठी अराजकता पसरली असुन, लोक देशातुन पलायन करण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा वापर करताना दिसता आहे, याच सगळ्या धावपळीत लोक एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसुन येता आहेत. अशातच एक व्हीडीओ समोर आला असुन यामध्ये काही नागरिक विमानाला लटकुन जात असल्याचे दिसते आहे. या घटनेत दोन नागरिक विमानाला लटकले असताना विमान हवेत गेल्यावर खाली पडल्याचे सुद्धा दिसुन येते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT