मलेशियात राजकिय संकट; पंतप्रधानांनी दिला राजीनामा

मुहिद्दीन यासीन (Muhyiddin Yassin) यांनी सोमवारी मलेशियाच्या राजांकडे (King of Malaysia) आपला राजीनामा सादर केला.
Muhyiddin Yassin
Muhyiddin YassinDainik Gomantak
Published on
Updated on

मलेशियाचे (Malaysia) पंतप्रधान मुहिद्दीन यासिन (Muhyiddin Yassin) यांनी 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीतच राजीनामा (Resign) दिला आहे. सरकार चालवण्यासाठी पुरेसे बहुमत न मिळाल्याने त्यांनी हा राजीनामा दिला आहे. अशाप्रकारे, ते देशावर सर्वात कमी काळ राज्य करणारे नेते बनले आहेत. मुहिद्दीन यासीन यांनी सोमवारी मलेशियाच्या राजांकडे (King of Malaysia) आपला राजीनामा सादर केला. यापूर्वी त्यांनी कबूल केले होते की, त्यांना राज्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुमताचा पाठिंबा नाही.

Muhyiddin Yassin
अफगाण सैन्यांची तालिबान्यांसमोर शरणागती, अमेरिकेचे प्रयत्न गेले वाया

विज्ञान मंत्री खैरी जमालुद्दीनने (Khairy Jamaluddin) इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिले की, 'मंत्रिमंडळाने राजांकडे राजीनामा सादर केला आहे.' उप क्रीडा मंत्री वान अहमद फैसल वान अहमद कमल यांनीही मुहिद्दीन यांची सेवा आणि नेतृत्वासाठी फेसबुक संदेशातून आभार मानले आहेत. याआधी यासीन सोमवारी मलेशियाच्या राजाला भेटण्यासाठी राजभवनावर पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी लगेच राजीनामा दिला. यासीन यांनी 18 महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारला होता. आधीच जागतिक महामारीशी तोंड (Coronavirus) देत असलेल्या मलेशियात आता एक नवे राजकीय संकट निर्माण झाले आहे.

Muhyiddin Yassin
एक लाख ग्रीन कार्ड जाणार वाया; बायडन प्रशासनाचं भारतीय IT प्रोफेशनल्सकडे दुर्लक्ष

कोरोनाची स्थिती योग्य प्रकारे हाताळणी न केल्याबद्दल सरकारवर टीका

मुहिद्दीन यासीन यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी नेत्यांनी सर्वोच्च पदासाठी संघर्ष सुरु केला. उपपंतप्रधान इस्माईल साबरी यांनी यासीनची जागा घेण्यासाठी आणि सरकार कायम ठेवण्यासाठी पाठिंबा दिला. यासीन यांचा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा त्यांच्या सरकारवर कोरोना महामारीची स्थिती योग्यरित्या हाताळत नसल्याबद्दल टीका केली जात आहे. मलेशियामध्ये जगाच्या तुलनेत सर्वाधिक संसर्ग आणि मृत्यू दर आहेत. सात महिन्यांच्या आणीबाणीनंतर आणि जूनपासून लागू करण्यात आलेले लॉकडाऊन, या महिन्यात दररोज कोरोनाचे 20 हजारांहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.

Muhyiddin Yassin
UNSC मध्ये अफगाणिस्तान परिस्थितीवर तातडीची बैठक

यासीन संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेऊ शकतात

स्थानिक माध्यमांनी सांगितले की, मुहिद्दीन यासीन येण्यापूर्वी राष्ट्रीय पोलीस प्रमुख, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आणि महाधिवक्ता यांनाही सोमवारी राजवाड्यात बोलावण्यात आले. यासीन यांनी सोमवारी त्यांच्या कार्यालयात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यांनी राजवाड्याच्या गेटवर पत्रकारांना हस्तांदोलन केले आणि नंतर 40 मिनिटांनी परत आले. असं सागंण्यात येत आहे की, संध्याकाळपर्यंत यासीन पत्रकार परिषद घेऊ शकतात. त्यांच्या सरकारला सुरुवातीपासून संसदेत केवळ अल्प बहुमत होते. डझनभर खासदारांनी त्यांच्या सरकारला पाठिंबा काढून घेतल्यानंतरच ते पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com