Defense Minister of Pakistan Khawaja Asif Dainik Gomantak
ग्लोबल

India Pakistan Tensions: 'भारताच्या हवाई संरक्षणाबाबत चीनने पुरवली गुप्तचर माहिती...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा खळबळजनक खुलासा

China Shared Intelligence With Pakistan: पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

Manish Jadhav

China Shared Intelligence With Pakistan: पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले की, 'भारतासोबतच्या संघर्षादरम्यान पाकिस्तानला चीनकडून मदत मिळत होती.' ख्वाजा म्हणाले की, 'चीन भारताबद्दलची गुप्तचर माहिती पाकिस्तानशी शेअर करत होता. दोन्ही देशांच्या संघर्षादरम्यान चीनने भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेशी संबंधित माहिती पाकिस्तानसोबत शेअर केली होती.'

चीनने पाकिस्तानला गुप्तचर माहिती दिली का?

मुलाखतीदम्यान ख्वाजा आसिफ म्हणाले की, 'भारतासोबतच्या (India) शॉर्ट वॉरपासून पाकिस्तान हाय अलर्टवर आहे. पाकिस्तानने आपली सतर्कता कमी केलेली नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की आम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत ही सतर्कता कमी केलेली नाही. एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. सामरिकदृष्ट्या एकमेकांशी निगडित असलेले देश गुप्तचर माहिती एकमेकांना शेअर करत असतात.''

दोन्ही देश गुप्तचर माहिती एकमेकांना देतात

आसिफ पुढे म्हणाले की, आमच्याकडे असलेली माहिती आम्ही चीनशी शेअर करतो. ही एक सामान्य गोष्ट आहे. चीनलाही भारतासोबत समस्या आहेत. सामरिकदृष्ट्या एकमेकांशी निगडित असलेली माहिती देश एकमेकांना गुप्तचर माहिती शेअर करत असतात. चीन आणि पाकिस्तान सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळवलेली माहिती एकमेकांना शेअर करतात.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भीषण हल्ल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानला (Pakistan) चोख प्रत्युत्तर दिले होते.7 मे रोजी मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. हे हवाई हल्ले त्या ठिकाणांवर करण्यात आले होते, जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमधील दहशतवादी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT