China Economy in sank after construction slowdown & Power cut Dainik Gomantak
ग्लोबल

चीनची अर्थव्यवस्था डबघाईला, बडे उद्योग दिवाळखोरीत

चीनची अर्थव्यवस्था (China Economy) पुन्हा एकदा डबघाईला आलेली जाणवत आहे. ताज्या अहवालानुसार नवीन तिमाहीत चीनच्या आर्थिक प्रगतीवर पूर्णविराम आला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना विषाणूच्या (COVID-19) महामारीतून सावरलेली चीनची अर्थव्यवस्था (China Economy) हळू हळू सुधारत असतानाच देशाचीअर्थव्यवस्था पुन्हा एकदा डबघाईला आलेली जाणवत आहे. ताज्या अहवालानुसार नवीन तिमाहीत चीनच्या आर्थिक प्रगतीवर पूर्णविराम आला आहे. असे सांगितले जात आहे की बांधकाम कामांवर (Real Estate Sector) मंदी आणि ऊर्जेच्या (China Power Issue ) वापरावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चीनची आर्थिक प्रगती ठप्प झाली आहे. (China Economy in sank after construction slowdown & Power cut)

जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनची अर्थव्यवस्था सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ 4.9 टक्के दराने वाढू शकते. तर पूर्वी हा आकडा 7.9 टक्क्यांपर्यंत होता. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती मिळाली आहे. कारखान्याचे उत्पादन, किरकोळ विक्री आणि बांधकामातील कमी होत असलेल्या गुंतवणुकीमुळे चीनला अशा गंभीर धोक्याला सामोरे जावे लागले आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अशी अपेक्षा होती की हा आकडा 5.2 टक्क्यांपर्यंत असेल. परंतु चीनची अर्थव्यवस्था या आकड्याला स्पर्श करण्यात अपयशी ठरली आहे. अपेक्षित 4.5 टक्क्यांच्या तुलनेत. सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन केवळ 3.1 टक्क्यांनी वाढू शकते.

बांधकाम हा चीनमधील एक महत्वाचा उद्योग आहे जो लाखो लोकांना रोजगार देतो. या क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी सरकारने अनेक प्रकारची नियंत्रणे लादली होती आणि यामुळे त्याचा लक्षणीय परिणाम झाला होता. चीनकडून कर्जावर कंपन्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी अलीकडेच एक नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम असा झाला की देशातील दुसरी सर्वात मोठी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी एव्हरग्रांडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

याशिवाय सप्टेंबर महिन्यात चीनमधील उत्पादन क्षेत्रावर लक्षणीय परिणाम दिसून आला आहे. अनेक प्रांतांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कंपन्यांना उत्पादन लक्ष्य गाठण्यात अपयश आले आहे. वीज संकटामुळे देशातील अनेक भागातील कारखान्यांना काम बंद करावे लागले आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की चीन हा जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जर उर्जा संकटावर लवकरच उपाय सापडला नाही तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.देशातील खासगी क्षेत्राकडूनही अशी भीती व्यक्त केली जात आहे की त्यांची उद्योग वाढ कल्पना केल्यानुसार झाली नाही.

चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने सोमवारी पत्रकार परिषदेत अधिकृत निवेदन जारी केले आहे. विभागाचे प्रवक्ते फू लिंगहुई म्हणाले, "अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत प्रवेश केल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी आव्हाने लक्षणीय वाढली आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

SCROLL FOR NEXT