बांग्लादेशात 'हिंदू' टार्गेटवर, मंदिरावर पुन्हा हल्ला

नवरात्रोत्सवात देवीच्या मंडपावर हल्ला झाला होता हे साऱ्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा हिंदू मंदिराला (Bangladesh Hindu Temple) लक्ष करण्यात आले आहे.
Other Hindu Temple attacks in Bangladesh
Other Hindu Temple attacks in BangladeshDainik Gomantak
Published on
Updated on

बांग्लादेशात (Bangladesh) गेल्या अनेक दिवसांपासून जातीय हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात काही धर्मांध लोक हिंदूंवरती हल्ले करताना दिसत आहेत. अगदी थोड्याच दिवसांपूर्वी नवरात्रोत्सवात देवीच्या मंडपावर (Bangladesh Navratri Pendola) हल्ला झाला होता हे साऱ्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा हिंदू मंदिराला (Bangladesh Hindu Temple) लक्ष करण्यात आले आहे. सतत होत असलेल्या या घटनांच्या निषेधार्थ हिंदू समाजाने देशव्यापी उपोषणाची घोषणा केली आहे.

'ढाका ट्रिब्यून' वृत्तपत्राच्या अहवालानुसार, बांगलादेशात वेगवेगळ्या ठिकाणी दुर्गा पूजेच्या ठिकाणांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या लोकांवर हल्ले करण्यात आले आहेत . यानंतर, शनिवारी देशाच्या राजधानीपासून सुमारे 157 किमी अंतरावर असलेल्या फेनी येथील हिंदूं मंदिरांची तोडफोड करत त्यांच्या दुकानांची तोडफोड आणि लूट करण्यात आली. या चकमकीत फेनी मॉडेल पोलीस ठाण्याचे प्रभारी निजामुद्दीन यांच्यासह किमान 40 जण जखमी झाल्याचे देखील अहवालात सांगण्यात आले आहे.

Other Hindu Temple attacks in Bangladesh
पेंडोरा पेपर्स प्रकरणी मुस्लिम लीगने इम्रान सरकारला घेरले

या अहवालात म्हटले आहे की, संध्याकाळी 4.30 वाजता सुरू झालेली चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या दरम्यान अनेक मंदिरे, हिंदूंच्या व्यावसायिक परिसराची तोडफोड आणि लूट करण्यात आली आहे . यानंतर, शनिवारी रात्री, अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस दल आणि निमलष्करी सीमा रक्षक डाळ तैनात केले. या वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आले होते की, दुर्गा पूजा उत्सवाच्या वेळी हिंदू मंदिरांवर हल्ले आणि तोडफोडीच्या विरोधात देशभरात निदर्शने झाली, तर तोडफोडीच्या घटनाही घडल्या आहेत.

दरम्यान, देशाच्या दक्षिण-पूर्वेकडील चिटगांव येथील बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेने दुर्गा पूजा उत्सवांच्या दरम्यान झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ 23 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन आणि उपोषणाची घोषणा केली आहे . परिषदेचे सरचिटणीस राणा दासगुप्ता यांनी चिटगांव प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की ढाकाचे शाहबाग आणि चिटगांवच्या अंद्राकिला येथे निदर्शने केली जातील.तर दुसरीकडे बांगलादेश पूजा उद्योग परिषदेने तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com