<div class="paragraphs"><p><strong>China</strong> Lockdown</p></div>

China Lockdown

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

दैनिक गोमन्तक

चीनमध्ये दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारने विविध ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) लावला आहे. परिणामी चीन मधील लाखो लोक सध्या घरी बसून आहेत.

चीनमध्ये (China) फेब्रुवारीत होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक परदेशी पाहुणे देशात दाखल होणार आहेत. स्पर्धेच्या वेळी कोरोना (Corona) रुग्णांमद्धे वाढ झाली तर ते सरकारसाठी चिंतेचे कारण ठरू शकते. भविष्यात ही परिस्थिती परिस्थिती उद्भवू नये म्हणून सरकार कडक पावलं उचलत आहे. मंगळवारी देशामध्ये 209 कोरोना बाधित सापडले आहेत. ही संख्या आमरिका (America) व यूरोपच्या (Europe) तुलनेत कमी असली तरी सरकारने लोकांवर निर्बंध लादले आहेत.

शिआन शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. येथील लोकांना दुकाने व व्यवसाय बंद करून घरी बसण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनमधील वृत्तपत्राच्या माहितीनुसार, शहरात 4,400 हून अधिक चाचणी केंद्र उभे केले आहेत. "आमच्याकडे जेवण नाही. वाहन चालविण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. दर तीन दिवसांनी घरातील एकच सदस्य किराणामाल खरेदीसाठी बाहेर पडू शकतो", असे शिआनमधील एका रहिवाशाने सोशल मीडियाद्वारे लोकांना सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT