China Dainik Gomantak
ग्लोबल

उईघुर मुस्लिमांचा छळ करणाऱ्यालाच चीनने बनवला शिंजियांग प्रांताचा नवा राज्यपाल

माजी डेप्युटी गव्हर्नर एर्किन टुनियाझ (Erkin Tuniaz) यांनी वायव्य प्रदेशातील चिनी धोरणांचा प्रत्येकवेळी बचाव केला आहे.

दैनिक गोमन्तक

चीनी अधिकारी शिंजियांग (Xinjiang) प्रांतामधील उईघुर मुस्लिमांवर (Uighur Muslims) अत्याचार करतात ते अनेकदा जगासमोर आले आहे. यातच आता चीनी सरकारने (Chinese government) शिनजिंयाग प्रांतासाठी नवा राज्यपाल (Governor) नियुक्त केला आहे. जिथे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष उईघुर आणि इतर मुस्लिम अल्पसंख्यांक गटांच्या (Minority Groups) सदस्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अत्याचार करतो. माजी डेप्युटी गव्हर्नर एर्किन टुनियाझ (Erkin Tuniaz) यांनी वायव्य प्रदेशातील चिनी धोरणांचा प्रत्येकवेळी बचाव केला आहे. मात्र सुविधा केंद्रातील कामकाजामुळे त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले आहे.

दरम्यान, चीनचे म्हणणे आहे की, या केंद्रांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात आणि लोकांना कट्टरतावादाच्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्याचबरोबर समीक्षक या सुविधेला एकाग्रता शिबिरे (Concentration Camps) म्हणून संबोधतात. यातच उईघूर समाजातील 59 वर्षीय तुनियाज यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी शिनजियांगमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर देखील काम केले आहे. तुनीयाज यांची नियुक्ती गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे आरोपही झाले आहेत.

क्वांगुओच्या देखरेखीखाली बांधलेले केंद्र

शिनझियांग प्रांतामध्ये प्रभावी अधिकारी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव चेन क्वांगुओ आहेत, ज्यांच्या देखरेखीखाली या प्रांतामधील कारागृह केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. आणि या कारागृहात अल्पसंख्याकांवर (China’s Xinjiang Autonomous Region) पाळत ठेवण्याची व्यवस्थाही तयार करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये संयुक्त राष्ट्रांना संबोधित करताना तुनियाझ म्हणाले, "या केंद्रांतील सर्व प्रशिक्षणार्थी ऑक्टोबर 2019 मध्ये पदवीधर झाले असून आता ते नोकरीही करत आहेत, आणि सामान्य जीवनही जगत आहेत." निरीक्षकांचे म्हणणे आहे की, ही केंद्रे आता कायमस्वरुपी केंद्रांमध्ये बदलण्यात आली आहेत.

गंभीर स्थितीत राहणारे लोक

दुसरीकडे, शिनझियांगमध्ये राहणारे लोक म्हणतात की, आम्ही सध्या भयंकर स्थितीचा सामना करत आहोत. आमची पारंपारिक संस्कृती आणि धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देखील चीनी सरकारकडून दिले जात नाही. अशा केंद्रांमधून पळून जाण्यात यशस्वी झालेले बरेच लोक देश सोडून गेले आहेत. उईघुर समुदयातील महिलांवर बऱ्याचदा चीनी अधिकाऱ्यांकडून बलात्कारही (China Xinjiang Camps) होतात. लोकांना साखळदंडाने डांबून ठेवण्यात येते. उईघुर मुस्लीम समुदयातील लोकांच्या कत्तली केल्याचा आरोपही चीनी सरकारवर करण्यात येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT