China again faces COVID-19 Pick in South China Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे थैमान, बस आणि रेल्वे सेवा बंद

दक्षिण चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (COVID-19) थैमान घालायला सुरूवात केली आहे

दैनिक गोमन्तक

दक्षिण चीनमध्ये (South China) पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (COVID-19) थैमान घालायला सुरूवात केली आहे . विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षिण चीनमधल्या बस (BUS) आणि रेल्वे (Railway) सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत. यासोबतच सिनेमा बार आणि इतर सुविधाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शांघायच्या (Shanghai) दक्षिणेस 2.9 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या पुतियन शहराबाहेरील प्रवाशांच्या 48 तासांच्या आत कोरोना नकारात्मक चाचणी करणे आवश्यक केले गेले आहे. (China again faces COVID-19 Pick in South China)

याअगोदर चीनने 2020 च्या सुरुवातीला स्वतःला कोरोनामुक्त देश म्हणुन घोषित केले होते , परंतु कोरोनाव्हायरसच्या अधिक संक्रामक डेल्टा आवृत्तीच्या उद्रेक चीनमध्ये झाला आणि चीनला पुन्हा कोरोनाचा सामना करावा लागत आहे . अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की डेल्टा व्हेरिएंटची बहुतेक प्रकरणे रशिया, म्यानमार आणि इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांमध्ये आढळली आहेत. नॅशनल हेल्थ कमिशनच्या मते, पुतियनमध्ये 24 तासांमध्ये 19 नवीन संक्रमणांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने शनिवारी जाहीर केले की रोग नियंत्रण कामावर देखरेख करण्यासाठी तज्ञांना पुतियनकडे पाठवण्यात आले आहे.

ग्लोबल टाइम्सच्या मते, पुतियनमधील नवीन प्रकाराचे पहिले प्रकरण जियान्यू काउंटीमधील एका विद्यार्थ्यामध्ये आढळले, परंतु तज्ञांना असा संशय आहे की हा विषाणू नुकताच सिंगापूरहून परतलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून आला आहे. ग्लोबल टाइम्सने स्थानिक अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितले की, प्रवाशाला 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आणि नऊ न्यूक्लिक अॅसिड आणि सेरोलॉजिकल चाचण्या घेण्यात आल्या असता त्या सर्व नकारात्मक होत्या. मात्र, शुक्रवारी ते तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दरम्यान कोरोनाचा देशात पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बस आणि रेल्वे सेवा शनिवारपासून बंद करण्यात आली आहे. यासह सिनेमागृहे, जिम, पर्यटन स्थळे आणि इतर सुविधा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, रेस्टॉरंट्स आणि सुपरमार्केटला ग्राहकांची संख्या काटेकोरपणे नियंत्रित करण्यास आणि तापाची तपासणी करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात मास्क घालणे बंधनकारक करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT