Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: गाझातील निर्वासितांच्या छावणीवर इस्रायलचा मोठा हल्ला; 94 पॅलेस्टिनी ठार, 200 हून अधिक जखमी

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल हमासशासित शहरांवर हल्ले करत आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल हमासशासित शहरांवर हल्ले करत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य गाझा येथील नुसेरात निर्वासित छावणीवर इस्रायलने मोठा हल्ला केला, ज्यामध्ये 94 पॅलेस्टिनी ठार आणि 200 हून अधिक जखमी झाले. गाझा मीडियानुसार, नुसेरात छावणीवरील इस्रायली हल्ल्यात सुमारे 94 लोकांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जखमींना अल-अक्सा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल-अक्सा रुग्णालयाने ऑपरेशन चालू ठेवण्यासाठी वैद्यकीय मदत आणि जनरेटरचा पुरवठा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना आवाहन केले आहे.

अल-अक्सा रुग्णालयाचे प्रवक्ते खलील अल-डाकरन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, नुसेरात छावणीवरील इस्रायली हल्ल्यात 55 पॅलेस्टिनी ठार झाले. रुग्णालयात मोठ्याप्रमाणात गर्दी आहे. हल्ल्यानंतर मध्य गाझाच्या सर्व भागातून काळ्या धुराचे लोट उठले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, इस्रायली लष्करी वाहने अचानक नुसेरात छावणीच्या पूर्व आणि वायव्येकडील भागात घुसली आणि त्यांनी छावणीच्या मोठ्या भागांना लक्ष्य केले.

आतापर्यंत 36 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू

अधिकृत पॅलेस्टिनी न्यूज एजन्सी वाफाच्या मते, इस्त्रायली विमानांनी गाझा शहरातील जायतून, तेल अल-हवा परिसर आणि मध्य गाझातील नुसेरात, अल-मगाझी आणि अल-बुरेज छावण्यांवर हल्ला केला. गाझा शहराच्या आग्नेयेकडील अल-जायतून येथील घरावर इस्रायली विमानाने बॉम्ब हल्ला केला, ज्यामध्ये चार पॅलेस्टिनी ठार झाले. दरम्यान, इस्रायली सैन्याने शनिवारी मध्य गाझातील नुसेरात छावणी आणि इतर भागांवर मोठा हल्ल्याची पुष्टी केली. एका निवेदनात लष्कराने म्हटले की, त्यांचे सैन्य नुसेरात भागातील "पायाभूत सुविधांवर" हल्ला करत आहे.

युद्धबंदीच्या प्रस्तावानंतरही हल्ले सुरुच आहेत

दुसरीकडे, तात्काळ युद्धबंदीची मागणी करणारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव असूनही इस्रायलने 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यापासून गाझावरील हल्ले सुरुच ठेवले आहेत. तेव्हापासून गाझामध्ये 36,800 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक महिला आणि मुले आहेत. तर सुमारे 83,700 लोक जखमी झाले आहेत. युद्ध सुरु झाल्यापासून गाझा अन्न, शुद्ध पाणी आणि औषधांच्या अभावामुळे उद्ध्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्त्रायलवर नरसंहाराचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने आपल्या ताज्या निर्णयात तेल अवीवला दक्षिणेकडील राफाह शहरामधील कारवाई ताबडतोब थांबवण्याचा आदेश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: गिरीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT